Jayant Patil reaction on BJP meet : 'होय, मी बावनकुळेंची वेळ घेऊन त्यांना भेटायला गेलो होतो, पण..!'; जयंत पाटलांचं पुन्हा ट्विट

BJP minister Chandrashekhar Bawankule Sharad Pawar NCP Jayant Patil : भाजप प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीवर जयंत पाटील यांची पहिली प्रतिक्रिया.
Chandrashekhar Bavankule & Jayant Patil
Chandrashekhar Bavankule & Jayant PatilSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजप मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीवर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.

या भेटीनंतर जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना जोर धरला असतानाच, मंत्री बावनकुळे यांच्याकडून या भेटीवर खुलासा झालेला असतानाच, आता जयंत पाटील यांनी देखील या भेटीवर त्यांच्या 'एक्स' खात्यावर पोस्ट शेअर केली आहे.

जयंत पाटील यांनी या भेटीवर मध्यरात्रीचे खंडण करताना, अशा अर्धवट बातम्या देणे खेदजनक असल्याचे म्हटले आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्याशी माझी मध्यरात्री भेट झाली, या अर्धवट बातम्या आहेत, असे सांगून भेटी मागचे कारण देखील सांगितले आहे.

Chandrashekhar Bavankule & Jayant Patil
Jayant Patil News : महाराष्ट्राच्या राजकारणातली मोठी बातमी: जयंत पाटील- बावनकुळे यांच्यात गुप्त बैठक; भेटीत काय ठरलं..?

सांगली (Sangli) जिल्ह्यातील महसूल विभागाच्या प्रश्नांबद्दल महसूलमंत्री बावनकुळे यांची वेळ घेऊन त्यांना भेटायला गेलो होतो. यामध्ये आष्टा येथील 4,6,9 जमिनींचे प्रश्न, आष्टा अप्पर तहसील कार्यालय इमारत प्रश्न, चांदोली वारणा धरणग्रस्तांचे प्रश्न, जमिनीवरील शेऱ्यांचे प्रश्नांचा समावेश होता. तसेच सांगल जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांच्या भूसंपादनाचे प्रश्वांवर त्यांची भेट घेतल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

Chandrashekhar Bavankule & Jayant Patil
Pune Revenue Officers Party : बावनकुळेंच्या खात्यातील अधिकाऱ्यांची 'अनधिकृत रिसॉर्ट'मध्ये पार्टी; वडेट्टीवारांचं ट्विट, आता अद्दल घडणार?

जयंत पाटील यांनी मंत्री बावनकुळे यांच्या भेटीच्या वेळीवर देखील खुलासा केला. मंत्री बावनकुळे यांनी सायंकाळी सहा वाजताची वेळ दिली होती. मात्र ते सुनावणीमध्ये असल्याने त्यांना यायला उशीर झाला. त्याच वेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे देखील त्यांच्या काही कामानिमित्ताने बावनकुळे यांना भेटायला आले होते.

या भेटीत काय चर्चा झाली, यावर देखील जयंत पाटील यांनी प्रकाश टाकला. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. विधानसभा सदस्य म्हणून एखाद्या मंत्र्याला त्यांच्या विभागाच्या कामासंदर्भात भेटणे हे काही गैर नाही. तरीही प्रसारमाध्यमे अशा प्रकारच्या बातम्या बनवितात हे खेदजनक आहे, असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com