Kinwat-Mahur Assembly Constituency News Sarkarnama
मराठवाडा

Maharashtra Assembly Election 2024 : `वंचित`च्या उमेदवाराने वाढवले आमदार केराम यांचे टेन्शन

BJP MLA Bhimrao Keram's tension increased in Kinwat-Mahur constituency : वंचित बहुजन आघाडीने ऐनवेळी आदिवासी (आंध) समाजातील उमेदवार दिल्याने मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र निर्माण झाले आहे. भीमराव केराम आणि वंचित चे प्रा.विजय खुपसे यांच्या दरम्यान आदिवासी आणि दलीत मतांचे विभाजन होण्याची दाट शक्यता आहे.

Jagdish Pansare

साजीद खान

Kinwat-Mahur Assembly Constituency : विधानसभेच्या किनवट विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने आदिवासी उमेदवार दिल्याने भाजपचे विद्यमान आमदार भीमराव केराम यांचे टेन्शन वाढले आहे. या मतदारसंघात कायम दुरंगी होणारी लढत वंचितच्या उमेदवारामुळे आता तिरंगी होणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी किनवट- माहूर मतदारसंघात प्रा.विजय खुपसे या आदिवासी समाजातील नेत्याला उमेदवारी जाहीर केल्याने आमदार केराम यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

तालुक्यात आदिवासी,बंजारा,मुस्लिम,दलित आदी समाजाचे एकगठ्ठा मतदान आहे. या मतदारसंघात बहुतांश वेळा माजी मंत्री डी.बी.पाटील या मराठा उमेदवाराचा अपवाद वगळला तर आदिवासी किंवा बंजारा समाजातील उमेदवारांनी विधानसभेत मुसंडी मारली आहे. (BJP) जातीय समीकरण लक्षात घेऊनच विविध राजकीय पक्ष या मतदारसंघात उमेदवार देतात. विद्यमान आमदार भीमराव केराम यांना सहज वाटणारी यंदाची निवडणुक खुपसे यांच्या उमेदवारीने चुरसीची होणार आहे.

वंचित बहुजन आघाडीने ऐनवेळी आदिवासी (आंध) समाजातील उमेदवार दिल्याने मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र निर्माण झाले आहे. भीमराव केराम आणि वंचित चे प्रा.विजय खुपसे यांच्या दरम्यान आदिवासी आणि दलीत मतांचे विभाजन होण्याची दाट शक्यता आहे. सुरूवातीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार प्रदीप नाईक यांना स्वतःच्या भावकितील नातलगांचे आव्हान समोर उभे ठाकल्याने अडचण निर्माण होतांना दिसत होती. आता मात्र दोन्ही उमेदवारांना निवडणुक सोपी नसल्याचे बोलले जात आहे.

भीमराव केराम यांना वंचित बहुजन आघडीचे प्रा.विजय खूपसे यांच्यासोबत थेट लढाई टाळावी लागेल, असे सांगितले जाते. तसेच मतदारसंघात बहुसंख्य असलेला आदिवासी समाजाचा पारंपारिक मतदार राखून ठेवण्याची कसरत केराम यांना करावी लागणार आहे. (Bhimrao Keram) केराम यांना पोषक वाटणारा मतदारसंघ आता अटीतटीच्या वळणावर पोहचला आहे. अनुसूचित जाती जमाती व आदिवासी समजाचे मतदान कोणाच्या पारड्यात पडणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

या प्रवर्गातील मतांचे विभाजन मात्र प्रदीप नाईक यांना फायद्याचे ठरेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. किनवट विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचे चित्र जातीय राजकारणाभोवती फिरत असल्याचे स्पष्ट आहे. बंजारा समाजाचे एकगठ्ठा मतदान कोणाच्या बाजूने पडणार ? सध्या हे स्पष्ट नसले तरी शिवसेनेचे सचिन नाईक निवडणुकीच्या मैदानात उतरले तर प्रदीप नाईक बॅफूटवर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

याक्षणी तळ्यात मळ्यात असलेले सचिन नाईक यांच्यावर भाजपा डाव लावू शकते, अशी चर्चा मतदारसंघात होताना दिसते आहे. सचिन नाईक यांना उमेदवारी मिळाल्यास किंवा त्यांनी अपक्ष निवडणूक लढविल्याने बंजारा समाजातील मातांचे विभाजन होणार हे निश्चितच आहे. मात्र या ठिकाणी मराठा,मुस्लीम,माळी,कुणबी समाजाच्या मतदारांची भूमिका देखील महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT