BJP Politics : नांदेडमध्ये भाजप मोठा डाव टाकणार, अशोक चव्हाण यांना लोकसभेची उमेदवारी?

BJP Politics Nanded Lok sabha By elections Ashok Chavan Congress:श्रीजया यांच्यासाठी अशोक चव्हाण मोर्चेबांधणी करत आहेत. त्यात लोकसभेची उमेदवारी त्यांना मिळाली तर ती ते स्वीकारणार का? असा प्रश्न आहे.
Ashok Chavan
Ashok ChavanSarkarnama
Published on
Updated on

BJP Politics : नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचे निधन झाले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसोबत नांदेड लोकसभेच्या जागेवर देखील पोटनिवडणूक होणार आहे. काँग्रेसने वसंत चव्हाण यांचा मुलगा रवींद्र चव्हाण यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपकडून माजी खासदार प्रतापराव चिखलीकर पुन्हा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत.

प्रताप चिखलीकर यांना पुन्हा उमेदवारी मिळणार की नाही यावर चर्चा सुरू असताना भाजपकडून उमेदवारीसाठी राज्यसभेतील खासदार अशोक चव्हाण यांच्या नावाची चाचपणी करण्यात येत असल्याची माहिती आहे.

लोकसभा निवडणुकीच्या आधी अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा हात सोडत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपकडून त्यांना राज्यसभेची खासदारकी देण्यात आली. अशोक चव्हाण यांच्या प्रवेशाने नांदेडची लोकसभेची जागा भाजपने सेफ केल्याची चर्चा होती. मात्र, भाजप उमेदवार प्रताप चिखलीकर यांना पराभव स्वीकारावा लागला. काँग्रेसचे वसंत चव्हाण विजयी झाले.

Ashok Chavan
Mahayuti News : कल्याण पूर्वेत महायुतीमध्ये उमेदवारीवरून जोरदार ताणाताणी; भाजप, शिवसेना शिंदे गटात वादाची शक्यता

अशोक चव्हाण हे आपली मुलगी श्रीजया हिला विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहेत. भोकर विधानसभा मतदारसंघातून श्रीजया या उमेदवार असण्याची शक्यता आहे. श्रीजया यांच्यासाठी अशोक चव्हाण मोर्चेबांधणी करत आहेत. त्यात लोकसभेची उमेदवारी त्यांना मिळाली तरी ती स्वीकारणार का? असा प्रश्न आहे.

लोकसभा निवडणुकीत प्रतापराव चिखलीकर यांचा तब्बल 80 हजार मतांनी वसंतराव चव्हाण यांनी पराभव केला होता. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सुरू असलेल्या आंदोलनाचा चव्हाण यांना फायदा झाल्याचे बोलले जात आहे. वसंत चव्हाण यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र रवींद्र चव्हाण हे काँग्रेसचे उमेदवार असल्याने त्यांना सहानुभूती असण्याची शक्यता आहे.त्यामुळे अशोक चव्हाण यांच्या सारखा बलाढ्य उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवून ही जागा पुन्हा खेचून आणण्याचा भाजपचा प्लॅन असल्याची चर्चा आहे.

Ashok Chavan
Baba Siddique : बाबा सिद्दिकींवर गोळीबार झाला तेव्हा काऊंटर फायरिंग का केली नाही? सुरक्षारक्षकाने घटनाक्रमच सांगितला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com