Harshwardhan Sapkal Sarkarnama
मराठवाडा

Harshwardhan Sapkal : सपकाळांचं तोंड काळ करा, दोन लाख देतो! भाजप आमदारांचा संताप, बाळासाहेबांचा उल्लेख करत राऊतांवर घणाघात

Narayan Kuche Slams Harshwardhan Sapkal, Sanjay Raut Over Tipu–Shivaji Comparison : जालना इथले भाजप आमदार नारायण कुचे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे तोंड काळे करणाऱ्यांना बक्षीस देण्याचं जाहीर केलं.

Pradeep Pendhare

Tipu Sultan controversy : टिपू सुतलान यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना भाजपने चौहू बाजूने घेरण्याची तयारी केली आहे.

भाजप अन् काँग्रेसचे कार्यकर्ते राज्यात ठिक-ठिकाणी आमने-सामने येत आहेत. यावरून कायदा-सु्व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यातच जालना जिल्ह्यातील भाजपने आमदार नारायण कुचे यांनी कार्यकर्त्यांना, हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात अधिक चिथावणी दिली आहे.

जालना इथले काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांच्या कार्यालयासमोर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी टिप सुलतान अन् छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना केल्याच्या विधानाचा भाजप आमदार नारायण कुटे यांनी निषेध केला.

'छत्रपती शिवाजी महाराजांकडे नितीमूल्य होते, सर्व धर्माचा आदर होता. शेतकऱ्यांचं संरक्षण केलं. स्वराज्य निर्माण केलं. परंतु टिपू सुलतान याने हजारो हिंदूंचं (Hindu) धर्मपरिवर्तन केलं. काँग्रेस यातून फक्त मतपेटीचं राजकारण करत आहे. याचा आम्ही निषेध करतो. हर्षवर्धन सपकाळ यांचं कुठेही तोंड काळ केल्यास, ते कोणीही करावं, त्याला दोन लाख रुपये बक्षीस देऊ, पण जालना इथं आल्यास आम्ही त्यांचं तोंड काळ करणारच आहोत,' असं आमदार नारायण कुचे यांनी जाहीर केलं.

बाळासाहेबांनी राऊतांच्या थोबाडात...

संजय राऊत यांनी, पाकिस्तान हा टिपू सुलतान यांना मानतो, पण त्यांच्याबरोबर भारतीय संघाने क्रिकेट खेळू नये, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागणी करावी, असे म्हटले आहे. यावर नारायण कुटे म्हणाले, "संजय राऊत यांना पाय चाटायची सवय लागली आहे. म्हणूनच त्यांचे जनमत संपलं आहे. संजय राऊत यांनी त्यांचा पक्ष संपवला. बाळासाहेब ठाकरे साहेब असते, तर राऊतांच्या थोबाडात मारून विचारले असते की, तू असा का बोलतो म्हणून!"

भाजप 'ध' चा 'मा' करतोय

दरम्यान, हर्षवर्धन सपकाळ यांनी वर्धा इथं प्रतिक्रिया देताना, 'ध' चा 'मा' करण्याची भाजपची जुनी सवय आहे. भाजप आंदोलकांना गोविंद पानसरे यांनी लिहिलेलं शिवाजी कोण होता? हे पुस्तक भेट देण्याचा अनुषंगाने आमचे ठिकठिकाणचे कार्यकर्ते कार्यालयात सक्रिय आहे, असे सांगितले.

सोलापूरकर, कोरटकर, कोश्यारींची आठवण

राहुल सोलापूरकर, प्रशांत कोरटकर, भगतसिंह कोश्यारी, या सर्व लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरण्याकरिता, भाजपने मुद्दाम पदरी ठेवला आहे का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. छत्रपतींचा पराक्रम हा फार मोठा आहे, कर्तृत्व अन् वैभव आहे. या वैभवाला कुठल्याही पद्धतीचा भाजपचा कांगावा हा सहन करून घेणार नाही, असे ठामपणे सपकाळ यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT