MLC Election Politics; Sanjay Kenekar sarkarnama
मराठवाडा

Sanjay Kenekar News: भाजपकडून विधान परिषदेसाठी पत्ता कट, केनेकरांचा जळजळीत स्टेट्‍समधून नेमका कोणाला इशारा? म्हणाले, 'छाटले जरी पंख माझे..'

Vidhan Parishad Election: भाजपकडून प्रत्यक्षात मंगळवारी(ता.28) यादी जाहीर झाली, तेव्हा प्रज्ञा सावंत यांचे एकमेव नाव मराठवाड्यातून पक्षाच्या यादीत दिसले, जे अपेक्षितच होते. भाजपाच्या यादीनंतर कुठेही इच्छुकांकडून जाहीर नाराजी जाहीर करण्यात आलेली नाही.

Jagdish Pansare

BJP News: विधान परिषदेच्या दहा जागांसाठी 12 मे रोजी होणाऱ्या निवडणूकीसाठी भाजपाच्या पाच उमेदवारांची यादी आज जाहीर झाली. यात अनेक अनपेक्षित नावे आहेत, तर ज्या नावांची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे, त्यावर पक्षाकडून फुली मारण्यात आली आहे. मराठवाड्यातून संजय केनेकर, कैलास गोरंट्याल, अर्चना पाटील चाकूरकर, सुरेश बनकर, जयदत्त क्षीरसागर अशा नावांची चर्चा होती.

भाजपकडून प्रत्यक्षात मंगळवारी(ता.28) यादी जाहीर झाली, तेव्हा प्रज्ञा सातव यांचे एकमेव नाव मराठवाड्यातून पक्षाच्या यादीत दिसले, जे अपेक्षितच होते. भाजपाच्या यादीनंतर कुठेही इच्छुकांकडून जाहीर नाराजी जाहीर करण्यात आलेली नाही. पंरतु संजय केनेकर यांनी आपल्या व्हाॅट्सअप स्टेटसवर केलेल्या जळजळीत कवितांच्या ओळींच्या उल्लेखाने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. यावरून ते नाराज असल्याच्या चर्चा होऊ लागताच त्यांनी 'मी नाराज नाही' असा खुलासा केला आहे.

भाजपा उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर संजय केनेकर यांनी आपल्या व्हाट्सअप स्टेटसवर एका मराठी कवितेच्या ओळी दिसून आल्या. 'विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही, छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी. अडवू शकेल मला, अजुन अशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे, केलेत कैक कावे.. जळेल झोपडी अशी, आग ती ज्वलंत नाही', यातून केनेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

या ओळींतून केनेकर यांनी नाराजी, पक्षांतर्गत विरोधकांना टोलेबाजी केल्याचे बोलले जाते. परंतु पक्षशिस्तीचा बडगा आपल्यावर उगारला जाऊ शकतो याची जाणीव होताच, केनेकर यांनी आपण नाराज नसल्याचे स्पष्ट केले. 'ती भावनिक पोस्ट मी नाराज आहे म्हणून नाही तर ती माझ्या कार्यकर्त्याची प्रेरणा वाढावी, त्यांचं आत्मबल कमी होऊ नये म्हणून केलेली आहे.

खरंतर 'माँ तेरा वैभव, माँ हम चार दिन रहें या ना रहें, माँ तेरा वैभव अमर रहें', खऱ्या अर्थान भारतीय जनता पक्षाच्या विचार, संस्कृतीने प्रेरित असणारा मी कार्यकर्ता आहे. माझे भाग्य आहे, की, ज्या राज्याचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस करतात, जे उपेक्षित, पीडित, कामगार, कसणाऱ्यांसाठी झटतात त्या प्रवासातला मी मावळा आहे. त्यांची संकल्पना लोकांपर्यंत नेणे ही माझी भूमिका, असल्याचे संजय केनेकर म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT