महापालिका निवडणुकीत उमेदवारीवरून भाजपमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता.
भागवत कराड यांनी पक्षाच्या सूचनेनुसार मुलगा हर्षवर्धन यांना माघार घ्यायला लावली होती.
आता स्वीकृत नगरसेवक पदावर हर्षवर्धन कराड यांची वर्णी लागण्याची चर्चा आहे.
Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation News : महापालिका निवडणुकीत उमेदवारीवरून भाजपमध्ये मोठा राडा झाला होता. इच्छुकांची संख्या अधिक असल्याने ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांनी मंत्री अतुल सावे, तत्कालीन खासदार भागवत कराड यांच्यावर नाराजांनी आपला रोष व्यक्त केला होता. लोकप्रतिनिधींनी आपल्या नातेवाईकांना उमेदवारी देऊ नये, या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेमुळे भागवत कराड यांनी आपले चिरंजवी हर्षवर्धन यांना माघार घ्यायला लावली होती.
परंतु राज्यसभेच्या निवडणुकीत माजी खासदार कराड यांना पक्षाकडून पुन्हा संधी मिळाली नाही. त्यामुळे महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदावर हर्षवर्धन कराड यांची वर्णी लावण्यात आल्याची चर्चा आहे. दरम्यान, आमदार संजय केनेकर यांच्या मुलानेही स्वीकृत नगरसेवक पदासाठी पक्षाकडे अर्ज केला होता. परंतु नंतर तो मागे घेण्यात आला होता. याबद्दल संजय शिरसाट यांनी लोकप्रतिनिधींच्या मुलाने निवडणुकीत उतरू नये किंवा कुठलेही पद घेऊ नये या निकषाचा दाखला दिला होता.
संजय केनेकर यांच्या आमदारकीची मुदत येत्या 13 मे रोजी संपत आहे. सध्या ते आमदार असल्यामुळे त्यांनी मुलाचे नाव स्वीकृत इच्छुकांच्या यादीतून मागे घेतले होते. तर कराड यांच्या राज्यसभेचा कार्यकाळ आधीच संपल्यामुळे ते या निकषात बसत नसल्याचा तर्क लावत त्यांनी आपल्या मुलाला स्वीकृत नगरसेवक केल्याची चर्चा आहे. दरम्यान, इतर चार जागांवर भाजपने पक्षातील निष्ठावंतांचाच विचार केल्याचे दिसते.
यामध्ये छाया खाजेकर, गोकुळ मलके, विजयसिंह झाला आणि अमृता पालोदकर यांचा समावेश आहे. आज भाजपाचे शहर-जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी त्यांच्या नावाचे पत्र महापालिकेचे गटनेते गोविंद केंद्रे यांच्याकडे सुपूर्द केले. आजच्या सर्वसाधारण सभेत या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. भाजपमध्ये स्वीकृत सदस्य पदासाठी तब्बल 147 जणांनी अर्ज केले होते.
दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून हनुमान शिंदे यांना स्वीकृत नगरसेवक पदाची लॉटरी लागली आहे. पक्षाला एक स्वीकृत सदस्य मिळणार होता. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून खासदार संदीपान भुमरे, उपमहापौर राजेंद्र जंजाळ समर्थक अशी ओळख असलेल्या शुभम काळे यांना पक्षाने संधी दिली आहे. एमआयएमने याआधीच आपल्या तीन उमेदवारांची नावे जाहीर केली होती. मोहमंद असरार शेख अहमद आणि कुणाल खरात या तिघांना एमआयएमने संधी दिली आहे.
1. भाजपमध्ये वाद कशामुळे झाला?
महापालिका निवडणुकीतील उमेदवारी वाटपावरून वाद झाला.
2. हर्षवर्धन कराड यांना आधी उमेदवारी का मिळाली नाही?
घराणेशाही टाळण्यासाठी पक्षाने त्यांना माघार घ्यायला सांगितले होते.
3. आता त्यांना कोणते पद मिळण्याची शक्यता आहे?
स्वीकृत नगरसेवक पदावर त्यांची नियुक्ती होण्याची चर्चा आहे.
4. भागवत कराड यांना काय फटका बसला?
त्यांना राज्यसभेच्या निवडणुकीत पुन्हा संधी मिळाली नाही.
5. या प्रकरणाचा राजकारणावर काय परिणाम होईल?
भाजपमध्ये अंतर्गत नाराजी वाढण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.