BJP MLA Sambhaji Patil Nilangekar addressing media after the collapse of the BJP–NCP alliance ahead of the Latur Municipal Corporation elections. Sarkarnama
मराठवाडा

Latur Election: राष्ट्रवादीत आलेल्या काँग्रेसच्या 'बी' टीमकडून मीठाचा खडा! भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकरांचा आरोप

Latur Municipal Election : लातूर महापालिका निवडणुकीआधी भाजप-राष्ट्रवादी युती तुटली असून, राष्ट्रवादीत नव्याने आलेल्या काँग्रेसच्या 'बी' टीममुळं युती बिघडवल्याचा आरोप आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला आहे.

Jagdish Pansare

Lature News : लातूर महापालिका निवडणुकीतही भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होणारी संभाव्य युती अखेरच्या दिवशी तुटली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नव्याने दाखल झालेल्या काँग्रेसमधील बी टीमकडून युतीमध्ये मीठाचा खडा टाकण्यात आल्याचा आरोप भाजपचे आमदार व लातूर महापालिका निवडणुकीचे प्रमुख संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला. मीठाचा खडा टाकणारे कोण? याचा शोध राष्ट्रवादीने घ्यावा, असे आवाहनही निलंगेकर यांनी केले. भाजप सर्व सत्तर जागांवर लढणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

राज्याच्या सत्तेत एकत्र असलेल्या महायुतीतील घटक पक्षांमध्ये महापालिका निवडणुकीत मात्र फाटले. लातूर महापालिकेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसापासून युतीसाठी मॅरेथाॅन मुलाखती सुरू होत्या. दोन्ही बाजुंचे नेते हे युतीची चर्चा सकारात्मक झाली, आम्ही लवकरच निर्णय जाहीर करू, असे सांगत होते. मग युतीचा निर्णय उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत का गेला? अस सवाल केला जात आहे.

गेल्या पाच दिवसांपासून भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना यांच्यात युतीसाठी बोलणी सुरू होती. भाजप 40 जागांवर, राष्ट्रवादी 25 आणि शिवसेना शिंदे गट 5 जागांवर निवडणूक लढवेल, असा फॉर्म्युला चर्चेत होता. परंतु अर्ज भरण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असतानाही युतीचे चित्र स्पष्ट होत नसल्याने तीनही पक्षांचे कार्यकर्ते आणि इच्छुक संभ्रमात होते. युतीतील दोन्ही प्रमुख पक्ष असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने काही जागांवर दावा केला होता. कोणीही माघार घेत नसल्याने अखेर युती तुटल्याचे बोलले जाते.

दरम्यान, संभाजी पाटील निलंगेकर यांनी आम्ही सकारात्मक आहोत, महायुतीबाबत चर्चा अंतिम टप्प्यात आहे, असे सांगितले होते. तर राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काळे जागा वाटपाचा तिढा सोडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, लवकरच चित्र स्पष्ट होईल, असे म्हणून वेळ मारून नेत होते. अखेर आज युती फिस्कटली आणि उमेदवारी दाखल करण्यासाठी सर्वच इच्छुकांची भागमभाग झाली.

स्वबळावर लढणार

लातूर महानगरपालिका निवडणुकीत भाजप सर्व 70 जागा स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा भाजप (BJP) नेते संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली. भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्यात होणारी युती अखेर तुटली असून, 'राष्ट्रवादीत नव्याने आलेल्या काँग्रेसच्या B टीमने युतीत मिठाचा खडा टाकला' असा आरोप निलंगेकर यांनी केला. तसेच राष्ट्रवादीने पक्षातील मिठाच्या खड्याचा शोध घ्यावा, असेही ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT