Mumbai News : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची नैतिकेच्या मुद्यावर मंत्री धनंजय मुंडे आणि त्यांच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी शिवसेनायुबीटीचे खासदार संजय राऊत यांनी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादा आणि मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, असेही राऊत यांनी म्हटले. खासदार राऊतांच्या या मागणीवर भाजपचे रावसाहेब दानवे यांनी फटकारलं आहे.
रावसाहेब दानवे म्हणाले, "मंत्री धनंजय मुंडे आणि अजित पवार (Ajit Pawar) यांचे राजीनामे मागणी मागायला ते आमच्या पक्षाचे पदाधिकारी आहे का? संजय राऊत काहीही बोलतात. त्यांनी त्यांचा पक्ष सांभाळावा. वाताहात झाली आहे. त्यांच्यामुळे भाजप-शिवसेनेची युती तुटली". त्यांना उद्धव ठाकरेंनी सांभाळलं नाही, तर ते ठाकरे पिता-पुत्रांमध्ये देखील भांडण लावू शकतात, असा देखील टोला दानवे यांनी लगावला.
रावसाहेब दानवे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर मोठं विधान केले. "स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राज्य पातळीवरील सर्वच पक्षांना कधी-कधी स्थानिक पातळीवरती निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे वरिष्ठांकडून जशा सूचना येतील, तसे आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना समोरे जाऊ. जालना महापालिकेत भाजपचाच (BJP) महापौर होईल", असे रावसाहेब दानवे यांनी म्हटले.
भाजप आमदार सुरेश धस यांनी बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येत निर्णायक भूमिका घेतली आहे. त्यांनी हे प्रकरण राज्यपातळीवर लावून धरले. यावर रावसाहेब दानवे यांनी जो एखाद्या भागातलं प्रतिनिधित्व करतो, त्याला आपल्या वेदना बोलून दाखवण्याचा अधिकार आहे, असे सांगितले. बीडच्या मोर्चात जाण्यासाठी आम्ही कोणाला थांबवलं नाही, सहभाग घेऊ नका म्हणून पक्षाचा काही, असा आदेश नाही. आम्ही अशा घटनांमध्ये कधीही कोणतेही राजकारण केलेले नाही. देशातील प्रत्येक घटनेवर कोण राजकारण करत आहे, सर्वांना माहीत आहे, असे म्हणत दानवे यांनी काँग्रेसला चिमटा काढला.
भाजपच्या राष्ट्रीय आणि प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडणुकीवर रावसाहेब दानवे म्हणाले, "भाजपच्या संघटने अंतर्गत लवकरच निवडणुका होतील. भाजपमध्ये दर तीन वर्षाने निवडणुका होतात. जानेवारीमध्ये संघटनेच्या निवडणुका होतील".
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.