Kunbi Caste Cancelled  sarkarnama
मराठवाडा

Kunbi Caste Cancelled : मराठवाड्यातील 'कुणबी' जातीचा पहिला बोगस दाखला रद्द; नगरसेवकपद धोक्यात

Kunbi Certificate Rekha Ankush Sarode : माजलगावच्या राजकारणात खळबळ निर्माण झाली आहे. बोगस कुणबी नोंदीच्या आधारावर नगरसेवक बनलेल्या रेखा सरोदे यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आली आहे.

सरकारनामा ब्यूरो

Beed News : बनावट कुणबी नोंदींच्या आधारे जात प्रमाणपत्र मिळवून निवडणूक जिंकलेल्या वॉर्ड क्रमांक १ च्या नगरसेविका रेखा अंकुश अंबुरे- सरोदे यांचे जात प्रमाणपत्र जिल्हा जात पडताळणी समितीने रद्द करून जप्त केले आहे. यामुळे माजलगावच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

रेखा सरोदे यांनी मौजे कुप्पा येथील सावंत आडनावाच्या वंशावळीतील नामसादृश्याचा फायदा घेत प्रशासनाची दिशाभूल करून हे प्रमाणपत्र मिळवले होते. यापूर्वी निवडणुकीदरम्यान सुमन माणिकराव मुंडे यांनी यावर आक्षेप घेतला होता. अखेर समितीने हे प्रमाणपत्र रद्द केल्याने आता सरोदे यांचे नगरसेवकपद धोक्यात आले आहे.

​दुसरीकडे, माजलगावचे उपविभागीय अधिकारी गौरव इंगोले यांनी एकाच कुणबी नोंदीवर दोन वेगवेगळ्या आडनावांना अवघ्या पाच दिवसांत प्रमाणपत्र मंजूर केल्याने संशय बळावला आहे. या प्रकरणात आमदार प्रकाश सोळंके यांच्या माध्यमातून प्रशासनावर दबाव आणल्याची चर्चा असून, या संपूर्ण बोगस प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

रेखा सरोदे यांनी सांगितले की, जिल्हा जात पडताळणी समितीने दिलेला निर्णय एकतर्फी व अन्यायकारक असून, यामागे काही राजकीय शक्तींचा हस्तक्षेप आहे. जनतेच्या कौलामुळे आणि संविधानाने दिलेल्या लोकशाही प्रक्रियेतून मी निवडून आले आहे.

मला भारतीय न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून, संविधानाने दिलेल्या अधिकारांचा वापर करून मी माझी बाजू न्यायालयासमोर भक्कमपणे मांडणार आहे. हा लढा मी कायद्याच्या चौकटीत राहूनच लढणार असून, अंतिम निर्णय सत्याच्या आणि न्यायाच्या बाजूनेच लागेल, असे सरोदे यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT