Rajabhau Waje : ठाकरेंशी इमान राखणारा टायगर घरी परतला ; वडिलांनी पाठीवर मारली थाप, मिठी मारताच राजाभाऊंना अश्रू अनावर

Rajabhau Waje Returns Home After Operation Tiger : नाशिक लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे शिवसेनेचे खासदार राजाभाऊ वाजे दिल्लीहुन शुक्रवारी मतदारसंघात परतले. यावेळी त्यांच्या समर्थकांनी त्यांचे जंगी स्वागत केले. त्यानंतर त्यांनी निवासस्थानी वडिलांची भेट घेतली.
Rajabhau Waje
Father’s Hug Leaves Rajabhau Waje OverwhelmedSarkarnama
Published on
Updated on

Rajabhau Waje, Nashik : ऑपरेशन टायगर अंतर्गत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे ६ खासदार फुटले आहेत. लवकरच हे सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मात्र, या फुटीच्या वादळातही 100 कोटींच्या विकासकामांची ऑफर आणि प्रलोभने धुडकावून लावत नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे हे एकनिष्ठ राहिल्याने देशभरात ते चर्चेत आले आहेत.

दिल्लीतील नाट्यमय घडामोडीनंतर शुक्रवारी (दि.१९) ते आपल्या मतदारसंघात अर्थात नाशिकमध्ये परतले. नाशिकरोड रेल्वे स्थानकावर शिवसैनिकांनी त्यांचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत केलं. रेल्वेस्थानकावर झालेल्या या अभूतपूर्व स्वागतावेळी त्यांनी हा आपला दुसरा विजय असल्याचं म्हटलं. मी ऑपरेशन टायगरचा भाग झालो नाही यांचे समाधान असल्याचं ते म्हणाले. त्यानंतर तेथून खासदार वाजे थेट आपल्या निवासस्थानी पोहोचले, तेव्हा तिथे अत्यंत हृदयस्पर्शी आणि भावूक क्षण पाहायला मिळाला.

घरात प्रवेश करताच राजाभाऊंनी आपले वडील प्रकाश वाजे यांचे पाया पडून आशिर्वाद घेतले. यावेळी त्यांच्या वडिलांनी अभिमानाने आपल्या निष्ठावंत पुत्राच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली. त्यांना प्रेमाने जवळ घेतले. यावेळी बाप-लेक दोघेही भावूक झाले होते. राजाभाऊंच्या अश्रुंचा पुन्हा एकदा बांध फुटला. वडिलांच्या कुशीत जाताच त्यांना अश्रु अनावर झाले. आपल्या मुलानं आपल्या कुळाला बट्टा लागू दिला नाही याचा अभिमान त्यांच्या वडिलांच्या चेहऱ्यावर दिसत होता. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा तिही लोकी झेंडा असे उद्गगार त्यांच्या वडिलांनी काढले.

Rajabhau Waje
Rajabhau Waje: नाशिकचा ‘राजा’ मैदानात! राजाभाऊ वाजेंचे जंगी स्वागत; आता भगवा अधिक जोमाने डोलणार!

राजाभाऊ वाजे यांना गळाला लावण्यासाठी शिंदे गटाकडून प्रयत्न झाले होते. यासंदर्भात स्वत: त्यांचे वडील प्रकाश वाजे यांनी माध्यमांशी बोलताना मोठा गोप्यस्फोट केला होता. 14 एप्रिल रोजी ठाण्याहुन दोन पदाधिकारी निवासस्थानी आले होते. विकास निधीची नावाने त्यांनी ऑफर दिली. एकनाथ शिंदे तुमचा योग्य तो सन्मान राखतील असं सांगितल्याचं प्रकाश वाजे यांनी सांगितलं,. मात्र, त्यानंतर ही ऑफर धुडकावली.

Rajabhau Waje
Karnataka MLC Election : भाजपला हादरा देणारा निकाल, 4-5 आमदार फुटले; काँग्रेसच्या दमदार विजयामागची इनसाईड स्टोरी...

ऑपरेशन टायगर बाबत बोलताना खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केला होता. प्रत्येक खासदाराला 15 कोटी रुपये टोकन म्हणून देण्यात आले आहेत. 100 कोटींच्या विकासकामांची ऑफर दिली जात होती. मात्र, वाजे कुटुंबाने या कोट्यवधींच्या ऑफर्सना भीक घातली नाही. त्यांनी पक्षांतरास स्पष्ट नकार दिला आणि ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतल्याचं संजय राऊत म्हणाले होते. दिल्लीतील पत्रकारपरिषदेतही राऊत यांनी राजाभाऊंच्या निष्ठेचे कौतुक केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com