Police presence intensifies in Gevrai after BJP leader Balraje Pawar’s arrest following violent clashes during municipal election voting in Beed district. Sarkarnama
मराठवाडा

Balraje Pawar: भाजपच्या माजी आमदाराचा भाऊ 48 तासात बाहेर; बाळराजे पवारांना जामीन

Balraje Pawar: मतदानाच्यादिवशी निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थिती प्रकरणी दाखल गुन्ह्यात कलमवाढ झाल्यानंतर पोलिसांच्या सूचनेनुसार बाळराजे स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाले होते.

Jagdish Pansare

Georai Political News : नगर परिषद निवडणुकीच्या मतदानादिवशीत गेवराई शहरात झालेल्या पवार–पंडित गटातील राड्याप्रकरणी भाजपचे बाळराजे पवार व अन्य चौघांना अटक करण्यात आली होती. गेवराई न्यायालयाकडून त्यांना आज जामीन मंजूर करण्यात आला आहे. काल या सर्वांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले होते. एक दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज पुन्हा आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. या सगळ्यांचा जामीन न्यायालयाने मंजूर केला.

मतदानाच्या दिवशी निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थिती प्रकरणी दाखल गुन्ह्यात कलमवाढ झाल्यानंतर पोलिसांच्या सूचनेनुसार बाळराजे स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाले होते. सोमवार 15 रोजी रात्री बाळराजे पवार यांना अटक करण्यात आली. अटकेनंतर न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. दरम्यान आज न्यायालयात हजर केल्यानंतर दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेत न्यायालयाने बाळराजे पवार यांचा जामीन मंजूर केला. याप्रकरणात ॲड. सानप, ॲड. जयस्वाल व ॲड. अमोल दाभाडे यांनी काम पाहिले.

नगरपालिका निवडणुकीसाठी मतदान सुरू असतांनाच गेवराई येथे 2 डिसेंबर रोजी भाजपचे बाळराजे पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या समर्थकांमध्ये मोठा राडा झाला होता. दगडफेक, एकमेकांच्या घरावर, पक्ष कार्यालयावर चाल करून केलेल्या हाणामारीमुळे गेवराईतील वातावरण बिघडले होते. याच प्रकरणात पोलीसांकडून गुन्हा दाखल झाल्यानंतर माजी आमदार लक्ष्मण पवार यांचे बंधु व भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार गीता पवार यांचे पती बाळराजे पवार यांना अटक करण्यात आली.

गेवराईतील राडा हा एकमेकांना जीवे मारण्याच्या षडयंत्राचा भाग होता, असा आरोप दोन्ही बाजूंनी करण्यात आला होता. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करत पोलीसी खाक्या दाखवला होता. तसेच हल्लेखोरांना जिल्ह्यातून हद्दपार करण्याची तसेच पोलीस स्वतः फिर्यादी होऊन गुन्हे दाखल करत कारवाई करेल, असे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार गेवराई पोलिसांनी 50 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले होते. यात बाळराजे पवार यांचाही समावेश होता. सुरवातीला अनेक आरोपींना ताब्यात घेऊन नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, तपासादरम्यान बाळराजे पवार यांच्यावरील आरोपांची व्याप्ती आणि गुन्ह्यातील कलमांमध्ये वाढ झाल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT