Kalyan Dombivali Election: "भाजपनं दार बंद करून जबरदस्ती पक्षप्रवेश करून घेतला"; माजी नगरसेवकाचा खळबळजनक आरोप

Kalyan Dombivali Election: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण शहरातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.
Kalyan Dombivali Election 2025
Kalyan Dombivali Election 2025
Published on
Updated on

Kalyan Dombivali Election: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण शहरातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिंदे गट आणि भाजपमध्ये अपक्ष माजी नगरसेवक अरुण गीध यांच्या पक्षप्रवेशावरून जुंपली आहे. अशातच, अरुण गीध यांनी भाजपवर केलेल्या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे.

Kalyan Dombivali Election 2025
Manikrao Kokate: हायकोर्टाचाही कोकाटेंना दणका! तातडीच्या सुनावणीस दिला नकार; कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता

माजी नगरसेवक अरुण गीध आणि त्यांच्या भगिनी वंदना गीध यांनी नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत अधिकृतरीत्या प्रवेश केला. या प्रवेशावर भाजपने जोरदार आक्षेप घेत शिंदे गटाला सुनावले होते, परंतु यानंतर गीध यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. माझ्या कार्यालयाशेजारीच भाजपचे कार्यालय असल्याने मी तिथे सहज गेलो होतो, मात्र तेथे कार्यालयाचे दार बंद करून माझ्या गळ्यात भाजपचा पट्टा टाकण्यात आला. आम्ही भाजप पक्षात प्रवेश केला असता, तर त्यांच्या अनेक कार्यक्रमात आम्हाला सन्मानाने का बोलावले नाही, असा सवाल गीध यांनी उपस्थित केला आहे, तर आमचा अधिकृत प्रवेश शिवसेनेत झाला असल्याचे वंदना गीध यांनी सांगितले.

Kalyan Dombivali Election 2025
VBA-Congress: आघाडी की आणखी काही? प्रकाश आंबेडकर अन् हर्षवर्धन सपकाळ यांच्यात नेमकी काय चर्चा झाली? जाणून घ्या इनसाईड स्टोरी

भाजपकडून व्हिडिओ

दुसरीकडे, भाजपने अरुण गीध यांचे आरोप खोडून काढण्यासाठी २५ ऑगस्टचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ जारी केला आहे. यामध्ये गीध स्व-खुशीने भाजपचा पट्टा घालून प्रवेशाचा अर्ज भरताना दिसत असल्याचा दावा भाजपने केला आहे. आम्ही युती धर्म पाळत असताना मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या नगरसेवकांना पक्षात घेणे हा पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रकार आहे, अशी टीकाही भाजप नेते नरेंद्र पवार यांनी केली होती.

Kalyan Dombivali Election 2025
Ashok Chavan On Prithviraj Chavan : सातत्यानं भाजपवर तोफ डागणाऱ्या पृथ्वीराजबाबांच्या विरोधात अशोक चव्हाण मैदानात; म्हणाले...

शिंदे गटाचे प्रत्युत्तर

या प्रकरणावर शिवसेनेचे शहरप्रमुख रवी पाटील यांनी भाजपची बाजू फेटाळून लावली आहे. नरेंद्र पवार हे केवळ प्रसिद्धीसाठी हे सर्व करत असून, अशा प्रकारे कुणाच्याही गळ्यात पट्टा टाकणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com