नवनाथ इधाटे
Cabinet Portfolio Allocation : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला मागील एकनाथ शिंदे सरकारच्या काळात शहरात एक तर ग्रामीणला दोन मंत्री पद देण्यात आली होती. मात्र, यावेळेस भाजपला मोठे यश आल्याने शहरी भागातच दोन्ही मंत्रिपदे दिल्याने ग्रामीण भागातील आमदाराला महायुतीच्या सरकारने मंत्रीिपदाचा ठेंगा दाखविला असल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे. मंत्रिमंडळाचे खातेवाटप देखील झाले आहे. मात्र, संभाजीनगर ग्रामीण मतदारसंघाच्या पदरी निराशाचा आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये नऊ विधानसभा मतदारसंघ आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर शहरात पूर्व, पश्चिम आणि मध्य हे तीन मतदारसंघ असून तर ग्रामीणमध्ये फुलंब्री, सिल्लोड- सोयगाव, गंगापूर -खुलताबाद, कन्नड, वैजापूर आणि पैठण हे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत.
या नऊ विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार विजयी झालेले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना पैठणचे संदीपान भूमरे आणि सिल्लोड सोयगावचे अब्दुल सत्तार यांना मंत्रिपदे दिली होती. तर भाजपने छत्रपती संभाजीनगर पूर्व मधील अतुल सावे यांना मंत्री केले. त्यामुळे शहरात एक तर ग्रामीणला दोन मंत्री पदे अशी परिस्थिती शिंदे सरकारच्या काळात होती. मात्र 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले असून जिल्ह्यात शिवसेनेचे सहा तर भाजपचे तीन आमदार आहेत.
सर्वच्या सर्व जागावर महायुतीच्या उमेदवाराने विजय मिळविला आहे. त्यामुळे यावेळेस ग्रामीणला दोन पेक्षा अधिक मंत्री पदे मिळणार अशी अपेक्षा होती. परंतु ती फोल ठरली आहे. भाजप आणि शिवसेनेने प्रत्येकी एक एकच मंत्री पद जिल्ह्याला दिले. यात पश्चिम मतदारसंघातून शिवसेनेचे संजय शिरसाठ तर पूर्व मतदारसंघातून अतुल सावे यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली. दोन्ही मंत्री पदे शहरातच दिली.
संदिपान भुमरे खासदार झाल्याने त्यांचा मुलगा विलास भुमरे, सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार, फुलंब्रीचे आमदार अनुराधा चव्हाण, गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनी सर्वांनीच मंत्रिपद मिळविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. परंतु यात त्यांना यश आले नाही. दोन्ही मंत्री पदे शहरातील आमदारांनाच दिल्याने ग्रामीण मतदारसंघाला महायुतीच्या सरकारने मंत्रीपदासाठी ठेंगा दाखवल्याची चर्चा मतदार संघात सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.