Chhagan Bhujbal : 'मग मला लढायला सांगायचं नव्हतं', छगन भुजबळांच्या निशाण्यावर अजितदादा

Chhagan Bhujbal VS Ajit Pawar NCP : मी लोकसभा लढण्याची तयारी करतो होतो तेव्हा निर्णय झाला नाही. आता म्हणतात राज्यसभेवर जा, असाी टोला भुजबळांनी अजित पवार यांना लगावला.
Chhagan Bhujbal, Ajit Pawar
Chhagan Bhujbal, Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Chhagan Bhujbal News : छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळावे म्हणून ओबीसी संघटना आग्रही आहेत. आज मुंबईत ओबीसी संघटनांची बैठक झाली या बैठकीत भुजबळ यांना मंत्रिपद मिळाले पाहिजे, अशी मागणी ओबीसी संघटनांनी केली. ओबीसी संघटनांसोबत छगन भुजबळ यांनी देखील चर्चा केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी अजित पवार यांचे नाव न घेता जोरदार निशाणा साधला.

'मी लोकसभा लढण्याची तयारी करतो होतो तेव्हा निर्णय झाला नाही. आता म्हणतात राज्यसभेवर जा. मी निवडणू आलोय म्हणजे तेथे मी राजीनामा देऊ? विधानसभा निवडणुकीत तुमची गरज आहे. तुम्ही येथे हवा आहात असे सांगितले. मग तेव्हाच मला लढायला सांगायचे नव्हते ना', असा संताप भुजबळ यांनी अजित पवारांचे नाव न घेता व्यक्त केला.

Chhagan Bhujbal, Ajit Pawar
Mahayuti News : मंत्र्यांच्या स्टाफ नेमणुकीवर मुख्यमंत्र्यांचा वॉच; 'या' अधिकाऱ्यांच्या नियुक्तीला लागणार ब्रेक

ओबीसी संघटनांची जी बैठक झाली त्यामध्ये ओबीसी आरक्षणासाठी माझा पुढाकार होता. त्यामुळे मला मंत्रिपद मिळण्यात काहीतरी गौडबंगाल आहे. ओबीसींची पाठराखण केली त्यामुळे हे काहीतरी वेगळे आहे, असे मत मला मंत्रिपद न मिळण्यामागे संशय व्यक्त केला गेला, असे भुजबळ यांनी सांगितले.

पत्रकारांनी छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने आता तुमची भूमिका काय असा प्रश्न केला. त्यावर ते म्हणाले, माझ्या भूमिकेची तुम्हाला फार घाई झाली आहे. भूमिका घेणार आहे त्यासाठीच यांच्याशी (ओबीसी संघटना) चर्चा करण्यासाठी येथे आलो होतो. मला मंत्रिपद न मिळाल्यामागे काही तरी गौडबंगाल आहे. त्यासाठी हा प्रश्न घेऊन ओबीसी संघटना राज्यभर लोकांमध्ये जाणार असल्याचे देखील भुजबळ यांनी सांगितले.

तरुणांची व्याख्या ठरवा?

पत्रकारांनी छगन भुजबळ यांना सांगितले की तरुणांना संधी द्यावी म्हणून तु्म्हाला संधी दिली नसल्याचे अजित पवार म्हणत आहे. त्यावर ते म्हणाले, तरुण कोण याची व्याख्या करायला हवी. 67 आणि 68 वय तरुण आहे का? असं म्हणत मंत्रिमंडळात स्थान दिलेल्या ज्येष्ठ नेत्यांवरून भुजबळांनी अजित पवारांना टोला लगावला. मंत्रिमंडळात तरुणांना स्थान देताना तरुण ज्येष्ठ असा समतोल साधला जातो, असे देखील भुजबळ म्हणाले.

Chhagan Bhujbal, Ajit Pawar
Assembly OBC MLA : विधानसभेत 'ओबीसी' आमदार वाढले; ते कसे? जाणून घ्या एका क्लिकवर...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com