Shivsena News : `मी मंदिरे उभारली, तुमच्या सारखी दारुची दुकाने नाही उघडली`, असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी पालकमंत्री संदीपान भुमरे यांना नाव न घेता लगावला. (Chandrakant Khaire News) संघटनात्मक जबाबदारीमध्ये छत्रपती संभाजीनगर व जालना लोकसभा मतदारसंघाची धुरा हाती आल्यानंतर खैरे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू केला आहे.
ठाकरे गटाकडून खैरे यांच्याकडे संभाव्य उमेदवार म्हणून पाहिले जाते. (Chandrakant Khaire) खैरे यांना तसे संकेत पक्ष नेतृत्वाकडून दिल्याची चर्चा असून त्यामुळे ते जोमाने कामाला लागल्याचे दिसते. खैरे यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा दौरा सुरू केला आहे. (Shivsena) वीस वर्ष खासदार राहिलेल्या खैरे यांनी पुन्हा एकदा आपल्या जुन्या पद्धतीने भेटीगाठी आणि बैठकाचा धडाका सुरू केला आहे.
राज्यातील बदलत्या घडामोडी, शिवसेनेत पडलेली फूट या पार्श्वभूमीवर खैरेंसाठी येणाऱ्या लोकसभेचा पेपर म्हणावा तितका सोपा असणार नाही. (Marathawada) ज्यांच्यासोबत २५-३० वर्ष काम केले, ज्यांना राजकारणात मोठं केलं त्याच्यांशीच दोन हात करण्याची वेळ या निवडणुकीत खैरे व ठाकरे गटावर येणार आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
महाविकास आघाडीचे लोकसभा निवडणुकीसाठीचे जागा वाटप ठरल्याची चर्चा आहे. संभाजीनगरची जागा अर्थातच ठाकरे गटाकडे असणार आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे खैरे यांना एक संधी देण्याच्या निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतल्याचे बोलले जाते. दुसरीकडे खैरे यांना महायुतीतल्या शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवाराशी लढावे लागणार? की मग भाजप ही जागा लढवणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांची तयारी पाहता खैरे यांचा सामना त्यांच्याशीच होईल, असे दिसते. अर्थात येत्या महिनाभरात हे चित्रही स्पष्ट होईल. खैरे यांनी मात्र प्रचाराला सुरूवात करत बैठका, मेळाव्यावर भर दिल्याचे दिसते. यातून पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्यासह भाजपच्या नेत्यांवर ते टीका करत आहेत.
भुमरे यांच्या पैठण मतदारसंघात शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे, सुषमा अंधारे यांचे दौरे झाले तेव्हा खैरे यांनी भुमरे यांनी अकरा दारूची दुकाने सुरु केल्याचा दावा केला होता. कन्नड येथे झालेल्या निष्ठावंत शिवसैनिकांच्या मेळाव्यात पुन्हा त्यांनी याच मुद्यावरून भुमरेंना टोला लगावला. `जनतेशी एकनिष्ठ, निष्ठेशी तडजोड नाही`, असे म्हणत खैरे विरोधकांवर तुटून पडत आहेत. लढणार आणि जिंकणार, असा दावाही ते भाषणातून करतांना दिसतात.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.