Chhagan Bhujbal 
मराठवाडा

Chhagan Bhujbal: भर सभेत भुजबळांनीही म्हटलं.. लाव रे तो व्हिडिओ! वडेट्टीवारांना खिंडीत पकडलं अन् विखेंसह भाजपला दिला इशारा

Chhagan Bhujbal: राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह त्यांनी भाजपला देखील निर्वाणीचा इशारा दिला. ओबीसींचं आरक्षण वाचवण्यासाठी त्यांनी अत्यंत आक्रमक भाषण केलं.

Amit Ujagare

Chhagan Bhujbal: आरक्षण बचाव हा नारा देत बीडमध्ये ओबीसी समाजाची महाएल्गार सभा पार पडली. यामध्ये मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी राज ठाकरेंच्या स्टाईलमध्ये 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना खिंडीत पकडलं. तर राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह त्यांनी भाजपला देखील निर्वाणीचा इशारा दिला. ओबीसींचं आरक्षण वाचवण्यासाठी त्यांनी अत्यंत आक्रमक आणि मुद्देसूदपणे भाषण केलं.

वडेट्टीवारांचा दाखवला व्हिडिओ

भुजबळ म्हणाले, ओबीसींचं आरक्षण वाचवण्यासाठी राज्यातील विविध भागात ओबीसींचे महाएल्गार रॅली निघाल्या. नागपूरमध्ये काँग्रेस नेते विजय वडेट्टीवर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघाला. पण मी त्या मोर्चाला गेलो नाही त्याचं कारण आज मी तुम्हाला सांगतो. लाव रे तो व्हिडिओ...असं भुजबळ यावेळी म्हणाले. यावेळी व्यासपीठावर मनोज जरांगे यांना उपोषणस्थळी जाऊन भेट दिल्याचा वडेट्टीवारांचा व्हिडिओ लावण्यात आला. या व्हिडिओत वडेट्टीवार यांनी म्हटलं होतं की, मराठवाड्यातील जो निजामाच्या काळातील मराठा समाज आहे त्याला कुणबी म्हणून ओबीसीतून आरक्षण दया, अशी आपली भूमिका असल्याचं म्हटलं आहे. यावरुन वडेट्टीवार हे डबल ढोलकी प्रमाणं वागत आहेत. जरांगेंसोबत वेगळं बोलतात आणि ओबीसीच्या व्यासपीठावर वेगळं बोलतात, असा आरोप करत वडेट्टीवारांना चांगलंच खिंडीत पकडलं.

भाजपला दिला इशारा

दरम्यान, मराठा आरक्षणविषयक उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे यांच्यावरही भुजबळ यावेळी तुटून पडले. भुजबळ म्हणाले, तो विखे कसा काय आला? विखे आला आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेला. बरं गेला तर गेला पण जीआर काढून गेला. त्यानंतर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे देण्यास सुरुवात झाली. त्यानुसार एकाच दिवसांत त्यांना कुणबी दाखले द्यायला सुरुवात केली. आम्हाला तर आठ ते दहा महिने लागले दाखले काढायला मग यांनाच कसे एका दिवसांत दाखले देत आहात? याबाबत मी मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री बावनकुळे यांना याबाबत विचारलं. तसंच भुजबळांनी भाजपला इशारा दिला की, हे जर थांबवलं नाही ना तर ओबीसी हा तुमचा डीएनए कधी सरकेल सांगता येणार नाही.

विखेंना दिला इशारा

विखेंनी जीआर काढून जरांगेंच्या हातात दिला, त्यात पात्र मराठा व्यक्तींना कुणबी म्हणून दाखला देण्यात यावा असं म्हटलं होतं. पण एकातासात पात्र हा शब्द काढण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये असताना विखेंनी परस्पर जीआरमधून हा शब्द कसा काय काढला? अशा शब्दांत भुजबळांनी विखेंना धारेवर धरलं. तसंच म्हणाले, मला मुख्यंमत्र्यांना सांगायचं आहे की ही मंडळी तुमच्या वाईटावर आलेली आहेत. तुम्हाला अडचणी निर्माण करणारे आहेत. त्यांचं टार्गेट ओबीसी नाही देवेंद्र फडणवीस आहेत. या भाजपच्या सगळ्या नेत्यांना मी सांगतो की, आज तुम्हाला ओबीसींच्या ताकदीवर १३५ आमदार मिळाले. त्या ओबीसींवर जर अन्याय कराल तर आज ओबीसी दुधखुळे राहिलेले नाहीत. त्यामुळं लवकरात लवकर यावर तोडगा काढला पाहिजे, अशा इशाराही यावेळी भुजबळांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT