Hasan Mushrif: मुश्रीफांचं असंही प्रेम! जगाचा पाठीवर कुठेही असले तरी; Whatsapp वरुन म्हशींवर 'असं' ठेवतात लक्ष

Hasan Mushrif: वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा हजरजबाबीपणा अनेकदा चर्चेत असतो, कुठला मुद्दा राजकीय दृष्ट्या कसा पटवून सांगावा? याची कला मंत्री मुश्रीफ यांच्यामध्ये आहे.
Hasan Mushrif
Hasan MushrifSarkarnama
Published on
Updated on

Hasan Mushrif News : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा हजरजबाबीपणा अनेकदा चर्चेत असतो. कुठला मुद्दा राजकीय दृष्ट्या कसा पटवून सांगावा? याची कला मंत्री मुश्रीफ यांच्यामध्ये आहे. मग तो राजकीय मुद्दा असो वा सहकारातील. सध्या गोकुळ दूध संघातील डिबेंचरचा मुद्दा तापला असताना गोकुळ दूध संघातील एका कार्यक्रमात त्यांच्या एका वक्तव्यानं याचा पुन्हा प्रत्यय आला आहे. गोकुळ दूध संघातील दूध संकलनाचा मुद्दा स्पष्ट करत असताना त्यांनी आपल्या गोठ्यातील म्हशींवर किती प्रेम आहे, हे दाखवून दिलं आहे.

Hasan Mushrif
Aurangabad Railway Station: औरंगाबाद रेल्वे स्टेशनचं नाव बदलणार! शासनाची मंजुरी, राजपत्र प्रसिद्ध

सध्या गोकुळ दूध संघाकडून दैनंदिन 18 लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पार केला आहे. गोकूळ समोरील नवीन आव्हाने पाहता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गोकूळ प्रशासनाला, संचालकांना आणि दूध उत्पादकांना नवे आव्हान मंत्री मुश्रीफ यांनी दिले आहे. आजपासून दिवाळीला सुरुवात होत आहे, याच्या पार्श्वभूमीवर गोकूळ दूध संघाकडून वसुबारस निमित्त गाय आणि वासराची पूजा करण्याचा कार्यक्रम आज आयोजित केला होता.

Hasan Mushrif
Sulbha Khodke : अजितदादांनी केलेली शिफारस वादात; अमरावतीच्या आमदार खोडकेंना नागपूरच्या राजकारणात 'नो एन्ट्री'?

या कार्यक्रमादरम्यान मंत्री मुश्रीफ यांनी बोलताना, गोकुळ दूध संकलनाचा आपण 18 लाख लिटरचा टप्पा पूर्ण केला आहे. आता हे टार्गेट 18 लाखांवरून 25 लाख लिटर दूध संकलनाचे टार्गेट आपण स्विकारूया, असं आवाहनही त्यांनी केलं. हे करत असताना जास्तीत जास्त दूध उत्पादक शेतकरी यामध्ये कसा येईल? याचा विचार गोकूळ प्रशासनाने करायला हवा. त्यासाठी म्हैस खरेदीसाठी जिल्हा बँकेने नियम बदलून दहा हजार रुपयांचं अनुदान देण्याची घोषणा केली, त्याचा फायदा अनेकांनी घेतला.

Hasan Mushrif
Sudha Murty caste survey : सिध्दरामय्यांचा मूर्ती पती-पत्नीवर संताप; थेट इन्फोसिसवर घसरले...

पण आता गोकूळ प्रशासनानं मजुरांना हाताशी धरून त्याचा फायदा त्यांना करून द्यावा. ज्या व्यापाऱ्यांनी 25-50 म्हशी घेतल्या ते गोकुळमध्ये दूध न घालता ठिपकुर्ली येथे बर्फी तयार करणाऱ्याला दूध घालतात. त्यामुळे अशा व्यापाऱ्यांना जवळ न करता छोट्या-मोठ्या शेतकऱ्यांना हाताशी धरा आणि दूध संकलन वाढवा, असे आवाहन केले. मात्र हे सांगत असताना, त्यांनी आपल्या घरातील उदाहरण दिले. मी माझा गोठा रोज ऑनलाईन पाहतो, गोठ्यात असणाऱ्या म्हशी मी व्हॉट्सअॅपवर पाहतो. आमच्या म्हशींचे रोजचे 280 लिटर दूध संकलन आहे, अशा शब्दांत मंत्री मुश्रीफ यांनी आपल्या घरच्या जनावरांवरील प्रेम व्यक्त केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com