Bhujbal OBC rally : बीडमधील मेळाव्याप्रसंगी भुजबळांची मोठी घोषणा; म्हणाले, 'ओबीसीसाठी दुहेरी लढाई लढणार'

Bhujbal statement Beed News : बीडमध्ये ओबीसींचा महाएल्गार मेळावा मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. यावेळी त्यांनी मनोज जरांगे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
Chhagan-Bhujbal
Chhagan-BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Beed News : बीडमध्ये ओबीसींचा महाएल्गार मेळावा मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. यावेळी त्यांनी मनोज जरांगे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्यासोबतच ओबीसी मेळाव्याप्रसंगी भुजबळांची मोठी घोषणा करीत येत्या काळात ओबीसीसाठी दुहेरी लढाई लढणार असल्याचे स्पष्ट केले.

बीडमधील संभाजी महाराज क्रीडांगणात होत असलेल्या ओबीसींचा महाएल्गार मेळाव्यातून मंत्री छगन भुजबळ यांनी जोरदार टीका केली. यावेळी माजी मंत्री धनंजय मुंडे, आमदार गोपीचंद पडळकर यांनी हजेरी लावली. मराठा समाज व आमच्यात अंतर वाढविण्याचे काम अंतरवलीच्या दारिंदे पाटील यांनी केले. छगन भुजबळ यांनी यावेळी मनोज जरांगे यांचा उल्लेख दारिंदे असा केला.

Chhagan-Bhujbal
Sharad Pawar : शरद पवारांना तीन टर्मच्या महिला आमदाराचा रामराम : अजितदादांच्या चालीने भाजपही टेन्शनमध्ये

ओबीसीचे आरक्षण संपल्याने राज्यात 15 जणांनी आत्महत्या केल्या आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही. त्यांना दहा टक्के आरक्षण दिले आहे. मात्र, आता ओबीसीतून आरक्षण मागितले जात आहे. आमच्या हक्काचे आरक्षण मागितले जात असल्याने आम्ही त्याला विरोध केला असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chhagan-Bhujbal
Sharad Pawar : शरद पवारांना तीन टर्मच्या महिला आमदाराचा रामराम : अजितदादांच्या चालीने भाजपही टेन्शनमध्ये

यावेळी भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न देण्याची मागणी केली. ओबीसी आरक्षण आमच्या हक्काचे आहे. आमच्या ताटातले आम्ही कोणाला देणार नाही. राज्य सरकारने 2 सप्टेंबरचा जीआर रद्द करावा, अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली.

Chhagan-Bhujbal
Uddhav Thackeray: दिवे 'मनसे' लावणार, उद्घाटन 'शिवसेना' करणार : ठाकरे बंधूंच्या 'मिले सूर मेरा तुम्हारा'चा आणखी एक अध्याय

आपल्याकडे काही लोक घुसवले आहेत. सुतळी बॉम्ब घेऊन आले आहेत. ते काही तरी गडबड करतील. त्यांना तिथेच दाबायचे आणि पोलिसांच्या हवाली करायचं. तुम्ही शांतपणे आपले नेते लोक काय सांगतात ते ऐकायचं. नेत्यांनी आपले विचारही कमीत कमी शब्दात पोहोचवायचे आहेत, असे यावेळी भुजबळ म्हणाले.

Chhagan-Bhujbal
Uddhav Thackeray : एकाच नियुक्तीतून ठाकरेंचा मेगा प्लॅन, भास्कर जाधवांबाबत उठणाऱ्या वावड्या रोखल्याच शिवाय स्थानिकसाठी रणनीतीही आखली

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com