Kishanchand Tanwani and Chandrakant Khaire Sarkarnama
मराठवाडा

Shivsena UBT News : खैरेंची 'कचोरी-समोसा' डिप्लोमसी फेल, नाराज तनवाणी दानवेंच्या बैठकीला जाईना?

Kishanchand Tanwani and Chandrakant Khaire : छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटात सध्या असेच नाराजी नाट्य सुरु आहे, असं दिसत आहे.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha Election : निवडणूक म्हटल्या की रुसवे-फुगवे आलेच. त्यात निवडणूक लोकसभेची असेल तर मग या नाराजी नाट्याला अधिकच धार येते. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटात सध्या असेच नाराजी नाट्य सुरु आहे. उमेदवारीच्या स्पर्धेवरून शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते तथा जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्यातील वाद राज्यभर गाजला. पण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तो थांबवला अन् खैरेंच्या निवडणूक प्रचाराला वेग आला.

त्यानंतर महानगरप्रमुख पदाच्या नियुक्तीवरून जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी नाराज झाले आणि खैरेंची डोकेदुखी पुन्हा वाढली. खैरे(Chandrakant Khaire) स्वतः तनवाणी यांच्या गुलमंडीवरील संपर्क कार्यालयात गेले. तिथे या दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली, कचोरी, समोसे खात झालेली ही चर्चा निष्फळ ठरली. दरम्यान, तनवाणी शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या वावड्या उठल्या. स्वतः तनवाणी यांनी याचे खंडण केले, पण महानगरप्रमुख पदावर नेमणूक करताना आपल्याला विश्वासात न घेतल्याचा त्यांचा राग कायम आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खैरेंची कचोरी, समोसा डिप्लोमसी फेल झाली आणि तनवाणी स्वतंत्रपणे खैरेंसाठी काम करत असल्याचा दावा करत आहेत. दुसरीकडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी खैरेंच्या प्रचारासाठी शहर व ग्रामीण अशा दोन्ही भागात बैठका, मेळावे घेणे सुरू केले आहे. आज शहरात विविध ठिकाणी दानवे यांनी बैठका घेतल्या, पण त्याला किशनचंद तनवाणी यांची अनुपस्थिती होती. त्यामुळे तनवाणी यांची नाराजी अद्याप कायम असल्याचे दिसून आले.

दुसरीकडे तनवाणी यांनी मात्र लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने माझे काम सुरू आहे. चंद्रकांत खैरे यांच्यासह आमच्या बैठकांचे नियोजन यापूर्वीच ठरलेले होते. उपशहरप्रमुखांसोबत माझ्या यापूर्वीच बैठकांच्या अनेक फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत, असे सांगत आपण नाराज नसून पक्षाचे काम करत आहोत, असे स्पष्ट केले. अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पदे न देता नवख्यांना पदे देण्यात आली, असा आरोप तनवाणी यांचा आहे.

त्यांचा रोख अंबादास दानवे(Ambadas Danve) यांच्याकडे असून त्यांनी या नियुक्ती केल्याचे बोलले जाते. त्यामुळे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला दांडी मारणारे तनवणी आज शहरातील विविध भागात दानवे यांनी घेतलेल्या पदाधिकाऱ्यांची भेटी व चर्चेला गैरहजर राहिले. यावेळी जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी यांच्यासह महानगरप्रमुख राजू वैद्य व इतर पदाधिकारी उपस्थित राहणार, असल्याचे सांगण्यात आले होते.

पण एकाही बैठकीला तनवाणी हजर राहिले नाही. दरम्यान, ठाकरे गटाने जिल्ह्यात तीन जिल्हाप्रमुख नियुक्त केले आहेत. प्रत्येकांना तालुके वाटून देण्यात आले असून तनवाणी महापालिका हद्दीत जिल्हाप्रमुख आहेत. त्यात महानगरप्रमुख म्हणून वैद्य यांची नियुक्ती करण्यात आली असल्याने दोघांचे अधिकार काय? असा पेच निर्माण झाला आहे. तर शहरातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या अंबादास दानवे करीत असल्याने पदाधिकाऱ्यांमध्ये धुसफूस सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT