Loksabha Election : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे आघाडी आणि युतीतील घटक पक्ष विविध मतदारसंघावर आपलाच दावा असल्याचे सांगत आहेत. बुलढाणा लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसने दावा केला आहे.
यावर बोलताना अंबादास दानवे यांनी या मतदारसंघावर आमचाच हक्क आहे. आम्ही महाविकास आघाडीत असलो तरी बुलढाणा आमचेच आहे, असं ठासून सांगितलं आहे. मात्र या मतदारसंघाचा उमेदवार उद्धव ठाकरे ठरवतील असेही ते म्हणाले. दानवे हे बुधवारी बुलढाणा दौऱ्यावर असतांना माध्यमांना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
लोकसभा निवडणुकीचे वारे वाहायला लागले आहेत. वेगवेगळ्या माध्यमातून विविध पक्ष मतदारसंघावर दावा करीत आहेत. महाविकास आघाडीतील जागावाटप अद्यापही ठरले नाही. त्यामुळे कुणाला कोणती जागा मिळणार हे निश्चित झाले नसतांना बुलढाणा या मतदारसंघावर दावा करणाऱ्या काँग्रेसला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे(Ambadas Danve) यांनी सुनावत बुलढाणा आमचाच असल्याचं म्हटलं आहे.
दानवे म्हणाले, 1996 पासून शिवसेना या मतदारसंघात जिंकत आली आहे. यामुळे या मतदारसंघावर आमचाच हक्क आहे. आम्ही सध्या महाविकास आघाडीत असलो तरी बुलढाणा आमचेच आहे, असे त्यांनी ठासून सांगितले आहे. मित्रपक्षाला मागणी करण्याचा अधिकार आहे, पण बुलढाण्यावर आमचाच अधिकार असल्याचे ते म्हणाले. मात्र या मतदारसंघाचा उमेदवार कोण हे उद्धव ठाकरेच ठरवतील असेही दानवे यांनी स्पष्ट केले.
पुढे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर दानवे म्हणाले, न्याय मिळत नसल्याने आम्ही जनतेच्या दरबारात जात आहोत. महापत्रकार परिषद ही जनता दरबारचाच एक भाग आहे. यावर टीका करण्याऐवजी सत्ताधाऱ्यांनी उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावी, असे आवाहनही अंबादास दानवे यांनी दिले.
तर बहुचर्चित असलेल्या दाओस दौऱ्यात 70 जणांचे शिष्टमंडळ नेण्याची गरजच काय? असा सवालही दानवे यांनी उपस्थित केला. इतक्या व्यक्तींना तिथे नेण्याची गरज नाही यासाठी सातजणही पुरेसे आहेत. असेही ते म्हणाले.
दानवे यांनी यावेळी मुख्यमंत्री आणि सत्ताधाऱ्यांवर टीका केली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर(Rahul Narwekar) यांनी जे खुलासे केले. न्यायनिवाडा करणारी कोणतीही व्यक्ती अशाप्रकारे खुलासे करीत नाही आणि जे खुलासे करतात म्हणजेच त्यांनी चूक केली असाच त्याचा अर्थ होतो, त्यामुळे शिंदे गटाचे आमदार अपात्र होणार, असा दावाही अंबादास दानवे यांनी केला.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.