Chandrakant Khaire  Sarkarnama
मराठवाडा

Chhatrapati Sambhajinagar Loksabha News : प्रचार कार्यालयाचा स्तंभ उभारला, ठाकरे सेना विजयाची गुढी उभारणार का ?

Chandrakant Khaire Sambhajinagar Loksabha 2024 News : प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनात आघाडी घेतलेली ठाकरेंची सेना लोकसभा विजयाची गुढी उभारण्यात यशस्वी होणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar : लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाचे गुऱ्हाळ सुरू असतानाच छत्रपती संभाजीनगरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून प्रचार कार्यालयाचे स्तंभ पूजन आज करण्यात आले. शिवसेना नेते व संभाव्य उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या हस्तेच या स्तंभाचे पूजन करण्यात आले. यानिमित्ताने ठाकरे गटाने लोकसभा प्रचारात आघाडी घेतल्याचेही दिसून आले. प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनात आघाडी घेतलेली ठाकरेंची सेना लोकसभा विजयाची गुढी उभारण्यात यशस्वी होणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवसेनेच्या या बालेकिल्ल्याला गेल्या लोकसभा निवडणुकीत अंतर्गत गटबाजी, हक्काच्या हिंदू मतांचे विभाजन, पक्षातूनच झालेली गद्दारी, युती असून भाजपने दाखवलेला हात अशा विविध कारणांनी तडा गेला. अनपेक्षितपणे एमआयएमचा महाराष्ट्रातील Maharashtra पहिला खासदार कट्टर हिंदुत्वाला साथ देणाऱ्या याच संभाजीनगरातून निवडून आला. तसं पाहिलं तर शिवसेनेच्या वैभवाला लोकसभा निवडणुकीतील Loksabha Election 2024 संभाजीनगरमधील पराभवानेच ग्रहण लागायला सुरुवात झाली होती, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. loksabha election 2024 latest political news

कारण लोकसभा आणि त्यानंतर सहा महिन्यांनीच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत युतीत लढलेले शिवसेना-भाजप हे मित्र याच निवडणुकीत वेगळेही झाले. मुख्यमंत्रिपदाचा दिलेला शब्द भाजपने फिरवल्याचा आरोप करत उद्धव ठाकरे यांनी थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊन महाविकास आघाडी स्थापन केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे Balasaheb thackeray यांना मला या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीत सामन्य शिवसैनिकाला बसवायचे आहे, हा दिलेला शब्द ठाकरे यांनी स्वतः मुख्यमंत्री होत पूर्ण केला.

पण भाजपने BJP ठाकरेंच्या या दगाबाजीची अशी काही सव्याज परतफेड केली, की उद्धव ठाकरे यांच्याकडे ना पक्ष राहिला, ना धनुष्यबाण चिन्ह. भाजपने निम्मी शिवसेना Shivsena फोडली आणि उद्धव ठाकरे यांची सत्ता अडीच वर्षांतच उलथवून टाकली. महायुतीच्या सत्तेत ठाकरेंच्याच शिलेदाराला मुख्यमंत्री करत जखमेवर मीठही चोळले. परिणामी आता राज्यात लोकसभा निवडणुकांना सामोरे जाताना अनेक मतदारसंघांत शिवसेना विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पाहायला मिळणार आहे.

छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर 1989 ते 2014 या पंचवीस वर्षांत 98-99 या एका वर्षाचा अपवाद वगळला तर शिवसेनेने इथे कायम भगवा फडकवला. पैकी सलग चार टर्म म्हणजे वीस वर्षे चंद्रकांत खैरे Chandrakant Khaire यांनीच या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. 91-96 दरम्यान, मोरेश्वर सावे दोन वेळा तर 96-98 या दोन वर्षांसाठी प्रदीप जयस्वाल यांनी संभाजीनगर Sambhajinagar लोकसभेवर भगवा फडकवण्याची कामगिरी पार पाडली होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मात्र शिवसेनेच्या विजयी घोडदौडीला लगाम लागला.

पक्षातीलच कन्नडचे तत्कालीन आमदार हर्षवर्धन जाधव Harshwardan Jadhav यांनी पत्नीला जिल्हा परिषदेत पराभूत केल्याचा वचपा काढण्यासाठी खैरेंना आव्हान दिले. मराठा फॅक्टरचा परिणाम एवढा झाला की, खैरेंची सगळी फिक्स मतं फुटली आणि ती हर्षवर्धन यांच्या खात्यात जाऊन पडली. तब्बल 2 लाख 83 हजार मतांचा सुरुंग लागल्याने खैरे यांच्या पराभवावर शिक्कामोर्तब झाले. दोघांच्या भांडणात एमआयएमच्या इम्तियाज जलील यांची लाॅटरी लागली आणि पाच वर्षांत विरोधी खासदार म्हणून त्यांनी 2024 मध्येही महायुती- महाविकास आघाडीसमोर तगडे आव्हान उभे केले आहे.

Edited By : Rashmi Mane

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT