midnight police encounter in Chhatrapati Sambhajinagar  Sarkarnama
मराठवाडा

Midnight Shootout: मध्यरात्री रंगला एन्काऊंटरचा थरार! पोलिसांच्या अंगावर गाडी घालणाऱ्या गुन्हेगाराचा खात्मा

midnight police encounter in Chhatrapati Sambhajinagar : पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत अमोल खोतकर ठार झाल्याची माहिती छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी दिली.

Mangesh Mahale

छत्रपती संभाजीनगरमध्ये सोमवारी मध्यरात्री वडगाव-कोल्हाटी परिसरात एन्काऊंटरचा थरार रंगला. पोलिसांच्या अंगावर गुन्हेगारने गाडी घालून फायरिंग केली, यावेळी पोलिसांनी केलेल्या काऊंटर फायरिंगमध्ये अमोल खोतकरचा मृत्यू झाला.

बजाज नगर परिसरात एका मोठ्या उद्योजकाच्या घरी दरोडा घालणाच्या प्रयत्नात अमोल खोतकर हा होता, त्यावेळी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत (Police Encounter) खोतकर ठार झाल्याची माहिती छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी दिली.

छत्रपती संभाजीनगरमधील उद्योजक लड्डा यांच्या घरावरील दरोडा प्रकरणात खोतकर हा मुख्य आरोपी होता. छत्रपती संभाजीनगर शहरातील वाळूज परिसरामध्ये उद्योजक लड्डा यांच्या घरावर दोन आठवड्यापूर्वी मोठा दरोडा टाकण्यात आला होता.

यावेळी साडेसहा किलो सोनं चांदी आणि रोख रक्कम लुटली होती. लड्डा यांच्या बंगल्यावर पडलेला सुमारे ६ कोटींच्या दरोड्यात आतापर्यंत पाच जणांना ताब्यात घेतलं आहे. दरोड्याचा मुख्य सुत्रदार अमोल खोतकर असल्याचा पोलिसांचा संशय होता.

पोलिस त्याचा मागावर होते. त्याला पकडण्यासाठी पोलिसांना सापळा रचला होता. त्याला मुसक्या आवळण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर त्याने गोळीबार केला. खोतकरने पोलिसांवर गाडी घालून गोळीबार केला.

त्याला पोलिसांनी केलेल्या काऊंटर फायरिंगमध्ये अमोलचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे. दुपारी पत्रकार परिषद घेऊन पोलिस माहिती देणार असल्याचे समजते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT