औरंगाबाद महापालिकेत MIM ने VBA वर भाजपला साथ देत असल्याचा आरोप केला.
या आरोपानंतर VBA नगरसेवक आक्रमक होत सभागृहात जोरदार वाद झाला.
विकास मुद्द्यांऐवजी आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय तणाव वाढल्याचे चित्र.
Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation News : छत्रपती संभाजीनगर महापालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून वंचित बहुजन आघाडीची भूमिका ही त्या पक्षाच्या बाजूने राहिल्याचा आरोप एमआयएमने केला आहे. या आरोपानंतर वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक अफसर खान, अमित भुईगळ हे चांगलेच आक्रमक झाले. आजच्या सर्वसाधारण सभेत भुईगळ यांनी एमआयएमचे आरोप खपवून घेणार नाही, असा इशारा दिला.
त्यावर विरोधी पक्षनेते समीर साजेद बिल्डर यांनीही वंचितच्या नगरसवेकांना सुनावले. तुमचे सभागृहातील वर्तन, काम पाहून वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर निश्चितच समाधानी नसतील. सभागृहात शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी, पाणी, कचरा या विषयावर बोलण्याऐवजी वंचितचे नगरसेवक एमआयएमच्या नगरसेवकांवर कारवाई कधी करणार? त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत, याची वारंवार आठवण करून देण्याचे काम करत आहेत.
आम्ही चुकलो असेल तर प्रशासन आमच्यावर कारवाई करेल, आमच्यावर दाखल झालेले गुन्हे आणि पुढे प्रशासन काय कारवाई करेल? या सगळ्या गोष्टीला आम्ही सामोरे जायला तयार आहोत. वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांना पोटदुखी का आहे? असा सवाल समीर बिल्डर यांनी एमआयएमला केला. आम्ही प्रशानसनाच्या कारवाईला आणि तुम्हालाही तोंड द्यायला तयार आहोत.
मी इम्तियाज जलील यांचा शिपाई आहे, आम्ही कोणालाही घाबरत नाही, असे सांगत समीर साजेद बिल्डर यांनी वंचितचे नगरसेवक अफसर खान यांच्यावर नाव ने घेता टीका केली. महापालिकेतील आजची चौथी सर्वसाधारण सभा आहे. पहिल्या सभेपासून सत्ताधारी भाजपा आणि एमआयएमच्या नगरसेवकांमध्ये खटके उडत आहेत. अफसर खान यांनी आज सभागृहात एमआयएमला आव्हान देताना मी कोणाच्या बापाला घाबरत नाही, असे विधान करत माईक उखडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सभागृहात एमआयएमचे नगरसेवक चांगलेच आक्रमक झाले होते.
एमआयएम हा विरोधी पक्ष असून आणि त्यांचे 33 नगरसेवक असताना अर्थसंकल्पात वंचितच्या नगरसेवकांना भाजपने झुकते माप देत त्यांना एमआयएमच्या नगरसेवकांपेक्षा अधिकचा निधी दिल्याने आज एमआयएमने यावर सभागृहात आक्षेप घेतला होता. भाजपा वंचितला मदत करत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. यातूनच एमआयएम-वंचितमध्ये वादाची ठिणगी पडली होती.
या सगळ्या घडामोडींमध्ये वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक हे भाजपाच्या बाजूने उभे राहून एमआयएमच्या नगरसेवकांवर कारवाईची मागणी करत आहेत, असा आरोप आहे. विशेषतः अफसर खान यांनी इम्तियाज जलील यांचा सभागृहात शक्ती कपूर म्हणून केलेला उल्लेख, महापौरांचा अवमान सहन करणार नाही, अशी भूमिका घेत एमआयएमच्या नगरसेवकांवर कारवाईची मागणी केली होती.
वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांनी सभागृहात सातत्याने भाजपाला मदत आणि एमआयएमची कोंडी करण्याची भूमिका घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. गेल्या तीन सर्वसाधारण सभेत वंचितच्या भूमिकेवरून एमआयएमने रान उठवल्याचे दिसून आले होते. आज विरोधी पक्षनेते समीर साजेद बिल्डर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांना थेट आव्हान दिल्याचे पहायला मिळाले.
1. हा वाद नेमका कशामुळे झाला?
MIM ने VBA वर भाजपला साथ देत असल्याचा आरोप केल्यामुळे वाद निर्माण झाला.
2. VBA नगरसेवकांची प्रतिक्रिया काय होती?
VBA नगरसेवकांनी आरोप फेटाळत सभागृहात आक्रमक भूमिका घेतली.
3. सभागृहात कोणते मुद्दे उपस्थित झाले?
शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी, पाणी आणि कचरा या मुद्द्यांवर चर्चा व्हायला हवी होती.
4. MIM ने काय आरोप केले?
MIM ने VBA नगरसेवक भाजपच्या बाजूने वागत असल्याचा आरोप केला.
5. या वादाचा पुढील परिणाम काय होऊ शकतो?
स्थानिक राजकारणात तणाव वाढण्याची शक्यता असून आगामी निवडणुकांवर परिणाम होऊ शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.