Aimim Politics : 'लोकांसाठी रस्त्यावर उतरणारच, कोणाच्या बापाला घाबरत नाही'; एमआयएमचे विरोधी पक्षनेते समीर साजेद आक्रमक!

Chhatrapati Sambhjinagar Muncipal Corporation Politics : छत्रपती संभाजीनगर शहरातील शहागंज भागात अतिक्रमण हटाव पथकाला झालेल्या मारहाणीचा मुद्दा आता चांगलाच तापला असून एमआयएम अधिक आक्रमक झाली आहे.
MIM
MIMSarkarnama
Published on
Updated on
  1. छत्रपती संभाजीनगर येथील शहागंज भागात अतिक्रमण हटाव पथकाला विरोध केल्याप्रकरणी 11 एमआयएम नगरसेवकांसह इतरांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

  2. विरोधी पक्षनेते समीर साजेद बिल्डर यांचाही या प्रकरणात समावेश असून त्यांनी महापालिका उपायुक्तांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले.

  3. या कारवाईनंतर एमआयएम अधिक आक्रमक भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे.

Chhatrapati Sambhjinagar : छत्रपती संभाजीनगर शहरातील शहागंज भागात अतिक्रमण हटाव पथकाला विरोध करत त्यांना हुसकावूण लावणे, शिवीगाळ केल्याप्रकरणी महापालिका प्रशासनाने एमआयएमच्या 11 नगरसेवकांसह इतर 4 जणांविरोधात पोलीसांत गुन्हे दाखल केले. विरोधी पक्षनेते समीर साजेद बिल्डर यांचाही यात समावेश आहे. या कारवाईनंतर एमआयएम अधिक आक्रमक झाली आहे.

समीर साजेद यांनी आम्ही नगरसेवक झालो ते लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी, त्यांच्यावर अन्याय होत असेल तर त्यांचा आवाज बनून न्याय मागण्यासाठी. तेच करता येत नसले तर नगरसेवक पद काय चाटायचे का? आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून कारवाईच्या बाजूने आहोत. पण महापालिकेने सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकाच्या सांगण्यावरून एकाच भागातील विशिष्ट समाजाच्या लोकांवर कारवाई करण्यास भाग पाडले.

महापालिकेचे उपायुक्त वाहुळ यांनी मनमानी कारवाई केल्यामुळे आम्हाला रस्त्यावर उतरावे लागले. आम्ही महापालिकेच्या पथकाला शिवीगाळ केली, मारहाण केली किंवा त्यांना हुसकावून लावले याचा एकतरी पुरावा, द्या. उलट मी हात जोडून या अधिकाऱ्यांना आणि पथकाला विनंती करत होतो, असा दावा विरोधी पक्षनेते समीर साजेद बिल्डर यांनी केला.

MIM
Aimim Political News : एमआयएम-शिवसेना संघर्षाची ठिणगी पडली; अतिक्रमणावरून भडका उडणार

अतिक्रमण हटाव पथकाच्या कारवाईत म्हणजेच शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल नगरसेवक पद रद्द होऊ शकते, पण आम्ही काही चुकीचे वागलो नाही. आम्हाला लोकांनी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी निवडून दिले आहे. त्यांच्यावर अन्याय होत असताना जर आम्ही त्यांच्या बाजूने उभे राहू शकणार नसूत, तर नगरसेवक होण्याचा काय फायदा? लोकांसाठी नगरसेवक पद गेले तरी आम्ही त्याची पर्वा करणार नाही.

पोलीसांनी माझ्यासह आमच्या नगरसेवकांवर केलेली कारवाई ही पुर्णपणे चुकीची आहे. आम्ही या विरोधात कोर्टात जाऊ. मी स्वतः या प्रकरणात जामीन घेणार नाही, पोलीसांनी मला अटक करावी, असे म्हणत समीर साजेद बिल्डर यांनी आक्रमक भूमिका घेत महापालिका प्रशासनाला आव्हान दिले आहे.

आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही...

आम्ही अशा पक्षात काम करतो, ज्या पक्षाचे आमचे नेते इम्तियाज जलील हे कोणाच्या बापाला घाबरत नाहीत. त्यामुळे आम्हीही कोणाच्या दबावाला घाबरणार नाही, कोणासमोर झुकणार नाही. गु्न्हे दाखल करून कोणी हे समजत असेल की आम्ही अन्याय सहन करू, तर ते कदापी शक्य होणार नाही. चुकीच्या गोष्टी घडत असताना आम्ही त्या शांतपणे सहन करू शकत नाही, असेही समीर साजेद बिल्डर यांनी म्हटले आहे.

MIM
Aimim Politics : नाराजांच्या राड्यानंतरही ओवैसीही जलील यांच्या पाठिशी : हल्ला MIM ला महापालिकेत 'बुस्ट' मिळवून देणार की 'बुमरँग' होणार?

FAQs :

1. गुन्हा कोणावर दाखल करण्यात आला आहे?
एमआयएमच्या 11 नगरसेवकांसह इतर चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

2. प्रकरण कशामुळे घडले?
अतिक्रमण हटाव पथकाला विरोध करत त्यांना हुसकावून लावणे व शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.

3. समीर साजेद बिल्डर यांनी काय भूमिका घेतली?
त्यांनी महापालिकेच्या मनमानी कारवाईचा आरोप करत लोकांसाठी रस्त्यावर उतरण्याचे समर्थन केले.

4. घटना कोठे घडली?
छत्रपती संभाजीनगर शहरातील शहागंज भागात ही घटना घडली.

5. पुढे काय होऊ शकते?
पोलीस तपासानंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया व राजकीय घडामोडी स्पष्ट होणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com