Municipal Corporation Voter List News Chhatrapati Sambhajinagar Sarkarnama
मराठवाडा

Municipal Corporation : महापालिकेसाठीची प्रारूप यादी सहा नोव्हेंबरला! इच्छुकांचा वाॅच अन् फिल्डिंगही!

Municipal Corporation Voter List : महापालिकेच्या पथकांना प्रभागाच्या हद्दीनुसार या याद्यांमध्ये चुका असतील, त्याची दुरुस्ती करावी लागणार आहे. दिवाळीचा सण संपताच अधिकारी-कर्मचारी याद्या अंतिम करण्याच्या कामाला लागले आहेत.

Jagdish Pansare

  1. छत्रपती संभाजीनगर महापालिकेची प्रारूप मतदार यादी जाहीर होताच इच्छूक उमेदवारांनी फिल्डवर हालचाली सुरू केल्या आहेत.

  2. प्रत्येक प्रभागातील मतदारसंख्या, बदल आणि नव्या नोंदींवर इच्छूकांची बारीक नजर आहे.

  3. महापालिका निवडणुकीची चाहूल लागताच स्थानिक राजकीय समीकरणं पुन्हा एकदा बदलताना दिसत आहेत.

माधव इतबारे

Chhatrapti Sambhajinagar : महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार याद्या अंतिम करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सध्या महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पथक प्रत्येक भागात जाऊन प्रभागाच्या हद्दी तपासणीचे काम करत आहेत. त्यात अनेक इच्छुक आपल्याला फायदेशीर मतदार प्रभागात घेण्यासाठी धडपड करत आहेत. प्रभागांच्या हद्दीवरील फायदा होईल, अशा मतदारांच्या ओढाओढीसाठी स्पर्धा सुरू असल्याचे बोलले जाते.

महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग रचना अंतिम केली आहे. 115 नगरसेवकांच्या अनुषंगाने 28 प्रभाग चार नगरसेवकांचे तर एक प्रभाग तीन नगरसेवकांचा असे 29 प्रभाग शहरात राहणार आहेत. प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर पुढील टप्पा मतदार यादी अंतिम करणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने वेळापत्रक ठरवून दिले असून, 6 नोव्हेंबरला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.

प्रारूप याद्यांसाठी नुकत्याच झालेल्या विधानसभा मतदारसंघनिहाय याद्यांचा वापर केला आहे. प्रशासनाने या याद्या प्रत्येक प्रभागानुसार वेगवेगळ्या केल्या आहेत. मतदार याद्या तयार करणाऱ्या महापालिकेच्या पथकांना प्रभागाच्या हद्दीनुसार या मतदार याद्यांमध्ये काही चुका असतील, त्याची दुरुस्ती करावी लागणार आहे. त्यानुसार दिवाळीचा सण संपताच अधिकारी-कर्मचारी याद्या अंतिम करण्याच्या कामाला लागले आहेत.

अनेक जण दिवसभर प्रभागात फिरल्यानंतर सायंकाळी महापालिका मुख्यालयात येऊन याद्यांवर नजर मारत आहेत. महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक व राजकीय पक्षांची तयार होणाऱ्या याद्यांवर बारीक नजर आहे. प्रभागांच्या काठावरचे फायद्याचे मतदार आपल्या प्रभागात ओढण्यासाठी अधिकाऱ्यांकडे फिल्डींग लावली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

प्रभागांमुळे वाढणार घोळ

छत्रपती संभाजीनगर महापालिकेची निवडणूक पहिल्यांदाच प्रभाग पद्धतीने होत आहे. यापूर्वीच्या सर्व निवडणुका वॉर्ड पद्धतीने झाल्यामुळे इच्छुकांच्या याद्यावर बारीक लक्ष होते. यावेळी प्रभाग असून, एका प्रभागात 30 ते 40 हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या राहणार आहे. मोठ्या मतदार याद्यांमुळे घोळ वाढतील आणि आक्षेपही जास्त येतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

FAQs

1. छत्रपती संभाजीनगर महापालिकेची प्रारूप मतदार यादी कधी जाहीर होणार?
महापालिकेची प्रारूप यादी सहा नोव्हेंबरला प्रसिद्ध केली जाणार आहे.

2. इच्छूक उमेदवारांची प्रतिक्रिया काय आहे?
अनेक इच्छूकांनी आपापल्या प्रभागातील मतदारसंख्या तपासण्यास आणि फिल्डवर तयारी सुरू करण्यास सुरुवात केली आहे.

3. या यादीचा निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो?
मतदार यादीतील बदलांमुळे प्रभागांचे राजकीय गणित बदलू शकते आणि उमेदवारी निर्णयावर थेट परिणाम होऊ शकतो.

4. अंतिम मतदार यादी कधी प्रसिद्ध होणार आहे?
हरकती व दुरुस्तीनंतर अंतिम मतदार यादी काही आठवड्यांत प्रसिद्ध केली जाईल.

5. नागरिकांनी नाव तपासण्यासाठी काय करावे?
नागरिकांनी राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर जाऊन किंवा स्थानिक कार्यालयात जाऊन आपले नाव आणि तपशील पडताळू शकतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT