छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकीसाठीची प्रारूप मतदार यादी ६ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे.
प्राथमिक यादीवरील हरकती व सूचनांनंतर अंतिम मतदार यादी २८ नोव्हेंबरला जाहीर केली जाणार आहे.
मतदारांनी आपले नाव, पत्ता आणि तपशील तपासून आवश्यक सुधारणा वेळेत करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
माधव इतबारे
Local Body Election 2025 : महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर आता मतदार यादी अंतिम करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी 130 कर्मचारी-अधिकाऱ्यांची महापालिकेने नियुक्ती केली आहे. विधानसभेच्या मतदार याद्यांची प्रभागनिहाय्य फोड करून 6 नोव्हेंबरला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर हरकती-सूचना मागविल्या जातील. 28 नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.
महापालिकेची (Municipal Corporation) रखडलेली निवडणूक घेण्यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. प्रभाग रचना नुकतीच अंतिम करण्यात आली असून, 115 नगरसेवकांची संख्या असल्याने 2011 ची लोकसंख्या गृहीत धरून चार सदस्यांचे 28 तर तीन सदस्यांचा एक या प्रमाणे 29 प्रभाग तयार करण्यात आले आहेत. प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर आता मतदार यादी अंतिम करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
यासंदर्भात निवडणूक विभागाचे प्रमुख तथा उपायुक्त विकास नवाळे यांनी सांगितले की, छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) महापालिका निवडणुकीसाठी विधानसभा मतदार संघासाठीची मतदार यादी वापरली जाणार असून, प्रभागनिहाय्य त्याची फोड केली जाणार आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदार यादी अंतिम करण्यासाठी महापालिकेतील 130 अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मौलाना आझाद संशोधन केंद्र येथे अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांनी बैठक घेऊन कामाची पद्धत सांगितली. मतदार यादी अंतिम करण्यासाठी एका प्रभागासाठी एक अशा 29 टीम तयार करण्यात आल्या आहेत. या टीममधील अधिकारी प्रभागाच्या हद्दीनुसार मतदार याद्या तयार केल्या जाणार आहेत. 6 नोव्हेंबरला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यावर 14 तारखेपर्यंत हरकती-सूचना मागविण्यात येतील. 28 नोव्हेंबरला मतदार यादी अंतिम केली जाणार असल्याचे नवाळे यांनी नमूद केले.
यादीनंतर कळणार मतदारसंख्या
महापालिका हद्दीत पूर्व, मध्य हे दोन विधानसभा मतदारसंघ पूर्ण आहेत. फुलंब्री आणि पश्चिम मतदारसंघाचा काही भाग महापालिका हद्दीत आहे. त्यामुळे या मतदारसंघातील किती मतदार महापालिकेच्या प्रभागात येतील हे प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे. महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने हा महत्वाचा टप्पा असणार आहे.
प्रश्न: छत्रपती संभाजीनगर महापालिकेची प्रारूप मतदार यादी कधी जाहीर होणार आहे?
उत्तर: प्रारूप मतदार यादी ६ नोव्हेंबर रोजी जाहीर होईल.
प्रश्न: अंतिम मतदार यादी कधी प्रसिद्ध होणार आहे?
उत्तर: अंतिम मतदार यादी २८ नोव्हेंबरला प्रसिद्ध होईल.
प्रश्न: मतदार यादीत नाव तपासण्यासाठी काय करावे लागेल?
उत्तर: निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर किंवा स्थानिक कार्यालयात नाव तपासता येईल.
प्रश्न: हरकती आणि सुधारणा सादर करण्याची संधी कधीपर्यंत मिळेल?
उत्तर: प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर काही दिवसांत हरकती दाखल करता येतील.
प्रश्न: या प्रक्रियेनंतर महापालिका निवडणुकीची पुढील पायरी कोणती असेल?
उत्तर: अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यानंतर प्रभागनिहाय उमेदवारी आणि निवडणुकीच्या तारखा निश्चित केल्या जातील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.