MLA Anuradha Chavan-Atul Chavan News Sarkarnama
मराठवाडा

Anuradha Chavan : माझा फोटो, नाव बॅनर, जाहिरातीत वापरणे बंद करा, अभियंता पतीचे आमदार पत्नीला पत्र!

Atul Chavan Letter To MLA Anuradha Chavan : मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी अनुराधा चव्हाण यांना थेट पत्र लिहून कार्यकर्त्यांना आवरण्याची विनंती केली.

Jagdish Pansare

  1. मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी आपल्या आमदार पत्नी अनुराधा चव्हाण यांना बॅनर जाहिरातीत फोटो न वापरण्याची विनंती पत्राद्वारे केली.

  2. या पत्रामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून या मागचे कारण चर्चेचा विषय ठरत आहे.

  3. पती-पत्नीतील पत्रव्यवहार आता महाराष्ट्रातील राजकीय चर्चेचे केंद्रबिंदू बनला आहे.

नवनाथ इधाटे

Phulambri Constituency News : फुलंब्री मतदारसंघाच्या भाजपा आमदार अनुराधा चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त मोठी बॅनर आणि जाहिरातबाजी करण्यात आली होती. विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी प्रतिनिधित्व केलेला फुलंब्री मतदारसंघ असल्याने याकडे वेगळ्या नजरेने पाहिले जाते. बागडे नाना यांचा राजकीय वारसा अनुराधा चव्हाण या पुढे चालवत आहेत.

फुलंब्रीतून विधानसभेवर निवडून गेल्यानंतरचा पहिलाच वाढदिवस असल्याने पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी तो उत्साहात साजरा केला खरा, पण तो करताना केलेल्या एका चुकीमुळे आता वेगळाच गोंधळ निर्माण झाला आहे. आमदार अनुराधा चव्हाण (Anuradha Chavan) यांच्यासोबत बॅनर आणि जाहिरातीमध्ये अतुल चव्हाण यांचेही फोटो वापरले. यावरून मुख्य अभियंत्यांना आता माहिती अधिकारात जाब विचारणारे अर्ज येऊ लागले आहेत.

त्यानंतर अतुल चव्हाण यांनी आमदार पत्नी अनुराधा चव्हाण यांना पत्र लिहून आपले फोटो जाहिरात, बॅनरमध्ये वापरू नये, अशी विनंती केली आहे. फुलंब्री मतदारसंघात भाजपच्या (BJP) विविध कार्यक्रमांमध्ये वृत्तपत्र जाहिरात आणि बॅनरवर आमदार अनुराधा चव्हाण यांच्यासोबत त्याचे पती मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांचेही छायाचित्र मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. मात्र याचा नाहक त्रास त्यांना सहन करावा लागत आहे.

या पार्श्वभूमीवर मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी अनुराधा चव्हाण यांना थेट पत्र लिहून कार्यकर्त्यांना आवरण्याची विनंती केली आहे. 'आपल्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी माझा फोटो वापरणे थांबवावे व माझे नाव किंवा छायाचित्र पक्षाच्या बॅनरवर किंवा जाहिरातीवर टाकणं टाळावे' अशी स्पष्ट विनंती त्यांनी पत्रातून केली आहे. या पत्राची जिल्ह्यात चांगलीच चर्चा होत आहे. मुख्य अभियंता म्हणून शासकीय पदावर असलेल्या व्यक्तीने पक्षाच्या बॅनरपासून स्वतःला दूर ठेवण्याची भूमिका घेतल्याने अनेकांनाही आता याचा विचार करावा लागत आहे.

आमदार अनुराधा चव्हाण यांचे कार्यकर्ते मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर सक्रिय असून विविध उपक्रम, सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांमध्ये त्या कार्यकर्त्यांद्वारे बॅनर व पोस्टर झळकविले जातात. मात्र आता मुख्य अभियंता यांच्या पत्रानंतर कार्यकर्त्यांची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राजकीय निरीक्षकांच्या मते, हे पत्र 'घरगुती संवाद'म्हणून न पाहता 'राजकीय संदेश'म्हणून पाहिले जात आहे.

शासकीय पदावरील पती मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी आपल्या प्रतिमेचा गैरवापर टाळण्याकरिता केलेली ही विनंती प्रशासनातही चर्चेचा विषय ठरत आहे. राजकीय निरीक्षकांच्या मते, हे पत्र 'घरगुती संवाद'म्हणून न पाहता 'राजकीय संदेश'म्हणून पाहिले जात आहे. शासकीय पदावरील पती मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी आपल्या प्रतिमेचा गैरवापर टाळण्याकरिता केलेली ही विनंती प्रशासनातही चर्चेचा विषय ठरत आहे.

FAQs

प्र.१. अतुल चव्हाण यांनी अनुराधा चव्हाण यांना पत्र का लिहिले?
उ. त्यांनी बॅनर जाहिरातीत आपला फोटो न वापरण्याची विनंती केली.

प्र.२. हे पत्र कोणत्या कारणामुळे चर्चेत आले?
उ. पत्रामागील राजकीय पार्श्वभूमीमुळे हे प्रकरण चर्चेत आले.

प्र.३. अनुराधा चव्हाण कोण आहेत?
उ. त्या आमदार असून अतुल चव्हाण यांच्या पत्नी आहेत.

प्र.४. या पत्रामुळे राजकीय वर्तुळात काय प्रतिक्रिया उमटल्या?
उ. विरोधक आणि समर्थक यांच्यात चर्चा व वादविवाद सुरु झाले आहेत.

प्र.५. हे पत्र सार्वजनिक कसे झाले?
उ. पत्र मीडियामध्ये लीक झाल्यामुळे ते व्हायरल झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT