Abhijeet Dipke | Amit Shah  Sarkarnama
मराठवाडा

Abhijeet Dipke: दीर्घ 'वंदे मातरम'च्या वादात अभिजीत दिपकेंनी मोदी-शहांना सुनावलं! म्हणाले, टेलिप्रॉम्टरशिवाय...

Abhijeet Dipke: देशात सध्या सुमारे ३ मिनिटांचं संपूर्ण वंदेमारम् हे राष्ट्रीय गीत म्हणण्याच्या मोदी सरकारच्या आदेशावरुन वाद सुरु आहे. याला विरोध करत काँग्रेसनं आम्ही वर्षानुवर्षे म्हणतो तसंच दोन कडव्यांचं वंदे मातरम् म्हणणार आहोत, असा पवित्रा घेतला आहे.

Jagdish Pansare

Abhijeet Dipke: शाळांमधून वंदेमातरम् म्हणण्याची सक्ती करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी एकदा टेलीप्रॉम्टरशिवाय वंदेमातरम् म्हणून दाखवावे, असे आव्हान कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी दिले आहे. देशात सध्या सुमारे ३ मिनिटांचं संपूर्ण वंदेमारम् हे राष्ट्रीय गीत म्हणण्याच्या मोदी सरकारच्या आदेशावरुन वाद सुरु आहे. याला विरोध करत काँग्रेसनं आम्ही वर्षानुवर्षे म्हणतो तसंच दोन कडव्यांचं वंदे मातरम् म्हणणार आहोत, असा पवित्रा घेतला आहे. तसंच इतर जाणकार मंडळींनी देखील सरकारच्या या निर्णयावर उलटसुलट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

त्याचबरोबर जयपूरमध्ये आमच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांवर झालेला हल्ला भ्याड आहे, असे कितीही हल्ले झाले तरी आमचे आंदोलन थांबणार नाही, असा इशाराही दिपके यांनी हल्लेखोरांना दिला आहे. जयपूरमध्ये शाळेची पाहणी करण्यासाठी गेलेल्या सीजेपीच्या कार्यकर्त्यांना गावातील लोकांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात काही कार्यकर्ते जखमी झाले, तर एकाचा हात मोडला. या हल्ल्यावर दिपके यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांना प्रतिक्रिया दिली. आमच्यावर हल्ले करून काही होणार नाही, त्यापेक्षा शाळांची अवस्था नीट करा. जोपर्यंत तुम्ही ते करणार नाहीत, तोपर्यंत आमचे आंदोलन थांबणार नाही.

जयपूरमधील शाळा ही एका म्हशीच्या गोठ्यात सुरू होती. मुलांची शाळा म्हशीच्या गोठ्यात कशी भरवली जाऊ शकते? याचाच जाब विचारायला आमचे कार्यकर्ते गेले होते. तर तिथे भाजपाच्या गुंडांनी त्यांच्यावर हल्ला केला. एखाद्या विद्यार्थ्याचा पालक शाळेत जाऊ तिथल्या सेवा-सुविधांची माहिती घेऊ शकतो, तर मग आम्ही त्यांच्याबरोबर तर बिघडले कुठे? असा सवाल दिपके यांनी केला. सरकारी शाळा सुधाराव्यात, तिथे स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, चांगल्या खोल्या व वातावरण मिळावे एवढीच आमची अपेक्षा आहे. पण भाजपा पक्षामध्ये सगळे गुंड भरले आहेत, आम्ही शाळेची पाहणी करायला गेलो की, त्यांना राग येतो, त्यातून जयपूरमधील हल्ल्यासारखे प्रकार घडतात.

मी लवकरच जयपूरला जाणार आहे, तत्पूर्वी मी भाजपा गुंडांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या आमच्या कार्यकर्त्यांना तातडीने उपाचर घेण्यास सांगितले आहे, असेही दिपके म्हणाले. कार्यकर्त्यांवरील हा हल्ला भ्याड आणि संताप आणणारा आहे. राजस्थानमध्ये भाजपाचे सरकार आहे, मग त्याच सरकारच्या गुंडांकडून हल्ले होत असतील तर दाद मागायची कोणाकडे आणि निवेदने द्यायची कोणाला? त्यामुळे त्यांना जे करायचयं ते करू द्या, आम्ही आमचे काम करत राहणार, असे दिपके यांनी स्पष्ट केले. आम्ही जिथे जिथे शाळांची पाहणी करायला जातो आहोत, तिथल्या त्रुटी दूर करण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत देत आहोत, त्यानंतरही सुधारणा झाल्या नाहीत, तर गावकऱ्यांना सोबत घेऊन आम्ही आंदोलन करणार, असेही दिपके यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT