

Vishakha Raut: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेविका आणि माजी महापौर विशाखा राऊत यांचं नगरसेवकपद जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केलं आहे. पण मुंबई महापालिकेत अद्याप हा विषय चर्चेला आलेला नाही, त्यामुळं महापालिकेकडून यावर अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. पण राऊत या दादर सारख्या शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मध्यवर्ती भागातून नगरसेवक असल्यानं ठाकरेंसाठी हा झटका मानला जात आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी विशाखा राऊत यांनी जे जातीचं प्रमाणपत्र सादर केलं होतं, त्या प्रमाणपत्राची पडताळणी केल्यानंतर ते योग्य नसल्याचा निष्कर्ष पडताळणी समितीनं काढला आहे. यापूर्वी महापौर असताना त्यांनी निवडणूक लढवली होती ती खुल्या गटातून लढवली होती. त्यामुळं त्यांच्या सध्याच्या जात प्रमाणपत्रावर संशय व्यक्त करण्यात आला असल्याची माहिती सुत्रांकडून मिळते आहे. त्यामुळं या तांत्रिक गोष्टीमध्ये अडकल्यानं त्यांचं नगरसेवकपद जिल्हाधिकाऱ्यांकडून रद्द करण्यात आलं आहे.
पण त्यांचं नगरसेवक पद रद्द झाल्यास दुसऱ्या क्रमांकावरील त्यांच्या प्रतिस्पर्ध्याला विजयी घोषित केल्यास एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा एक नगरसेवक महापालिकेत वाढू शकतो. प्रिया सरवणकर ज्या राऊत यांच्या विरोधात उभ्या होत्या त्यांनी तीन महिन्यांपूर्वीच जात पडताळणी समितीकडं राऊतांविरोधात तक्रार दिली होती.
हे प्रकरण आता महापालिका आयुक्तांसमोर चर्चेला येऊन त्यावर मुंबई महापालिकेत सभागृहात चर्चा होईल आणि त्यानंतर महापौर जो अंतिम निर्णय घेतली त्यानुसार, विशाखा राऊत यांच्यावर कारवाईची शक्यता आहे. पण अद्याप विखाशा राऊत यांच्याकडं तीन महिन्यांचा वेळ असल्यानं त्यांना या काळात जर त्यांनी जात पडताळणी योग्य प्रकारे करुन घेतली तर त्यांच्या नगरसेवकपद रद्दचा निर्णयही रद्द होऊ शकतो.
"जात पडताळणी एसडीओला देता येत नाही, ज्युरिस्डिक्शनवरुन त्यांनी माझं जात प्रमाणपत्र अवैध ठरवलं आहे. नवीन नियमानुसार, माझं जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्यानंतर त्याविरोधात अपिल करता येतं यासाठी तीन महिन्याचा अवधी दिला जातो. म्हणजे माझं नगरसेवकपद हे अधिकृतरित्या अद्याप रद्द झालेलं नाही, माझ्याकडं ते वैध ठरवण्यासाठी अद्याप तीन महिन्यांचा कालावधी बाकी आहे. माझ्या पणजोबांपासूनच्या कुणबी जातीचे दाखले माझ्याकडं आहेत. त्यामुळं शिंदे गटानं जात पडताळणीचे अध्यक्ष आहेत रामदार केवड यांच्यावर खूप दबाव आणला आणि हा प्रकार घडवून आणला असा गंभीर आरोपही यावेळी विशाखा राऊत यांनी केला आहे. यापूर्वी माझ्याकडं जात प्रमाणपत्र नव्हतं पण मी त्यासाठी अर्ज केला होता, त्यानंतरच मला निवडणूक लढवण्यासाठी परवानगी देण्यात आली होती," असंही यावेळी विशाखा राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.