प्रकाश बनकर
Chhatrapati Sambhajinagar News : मराठा समाजातर्फे निवडणुकीसंदर्भात उमेदवारी ठरवण्यासाठी आज (शुक्रवारी) हडकोतील मराठा मंदिर या ठिकाणी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत इच्छुकांनी उमेदवार नावे जाहीर करावी व सजेशन मांडावे असे सांगण्यात आले होते. या बैठकीत मोठा गोंधळ निर्माण झाला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
त्याचे झाले असे की, मराठी समाजातर्फे (Maratha Community) निवडणुकीसंदर्भात उमेदवारी कोणाला द्यायची, या निर्णयासाठी बैठक बोलावण्यात आली होती.
या बैठकीला उपस्थित असलेल्या विकी राजे नावाच्या तरुणाने बैठकीत आपले मत मांडले काहीतरी बोलला. म्हणून समाजातील इतर तरुणांनी थेट त्याला मारहाण केली. या बैठकीचा निरोप सर्वांना मिळालेला नव्हता.
मात्र, काही लोकांना फोन करून बोलवण्यात आले होते. त्यानंतर ही बैठक सुरू झाली. या बैठकीला सर्वांना निरोप का देण्यात आला नाही, असा जाबही काही जणांनी विचारला. त्याचवेळी उपस्थितांपैकी एका महिला उमेदवाराच्या नावाची घोषणा केल्यानंतर सर्वांनी त्याला विरोध दर्शवला.
त्यानंतर काही उमेदवारांनी मराठा आरक्षण (Maratha Reservation) याचिका करते विनोद पाटील यांचे नाव सुचवले. त्याचवेळी काही जणांनी बैठकीत चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांची सुपारी घेऊन आले असल्याचा आरोप केला. त्यानंतर गोंधळ सुरू झाला आणि थेट काही तरुणांनी विकी राजे या तरुणाला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.
विकी राजे (Vikey Raje) यांनी प्रस्थापित लोकांनाच उमेदवारी व त्यांचीच नावे समोर येत असल्याचा आरोप करत त्यांच्या लोकांनी मला मारहाण केले असल्याचे सांगितले. मी काहीच बोललो नसल्याचेही विकी राजे यांनी सांगितले. दरम्यान, विकी राजे यांनी खाली बसून शिवीगाळ केली असल्याचा आरोप काही समन्वयकांनी केला, त्यामुळे मारहाण झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.
Edited By : Rashmi Mane
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.