Dharashiv Loksabha 2024 : माणूस भाजपचा, चिन्ह राष्ट्रवादीचे अन् म्हणे उमेदवार महायुतीचा...

Mahavikas Aghadi महाविकास आघाडीने उमेदवार जाहीर करून प्रचारही सुरू केला आहे, तर दुसरीकडे महायुतीच्या प्रमुख तिन्ही घटक पक्षांकडून अजूनही दावे-प्रतिदाव्यांचाच खेळ सुरू आहे.
Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadanvis
Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadanvis sarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News : महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांतील जागावाटप रखडले होते. पैकी शिवसेनेने आठ उमेदवारांची यादी जाहीर केली. राष्ट्रवादीने तोंडी काही उमेदवारांच्या नावाला हिरवा कंदील दाखवला असला तरी त्यांचा एकही उमेदवार अधिकृत जाहीर झालेला नाही. अशातच धाराशिव लोकसभा मतदारसंघात माणूस भाजपचा, चिन्ह राष्ट्रवादीचे अन् उमेदवार महायुतीचा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

काही मतदारसंघामध्ये अशा प्रकारचे बदल होऊ शकतात याची पूर्वकल्पना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. या अदलाबदलीचा प्रयोग मराठवाड्यातील धाराशिवमधूनही होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी कडून पुन्हा एकदा ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांची उमेदवारी ठाकरे गटाने जाहीर केली आहे. ओमराजे यांना आव्हान देण्यासाठी महायुतीकडून मैदानात कोण असेल? याचा फैसला आज, उद्या होण्याची शक्यता आहे.

या लोकसभा मतदारसंघात कागदावर महायुतीचे बळ मोठे आहे. निलंगा विधानसभा मतदारसंघातील 60 पेक्षा अधिक गावांसह सहा विधानसभा मतदारसंघाचा या लोकसभा मतदारसंघात समावेश आहे. धाराशिव विधानसभा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाकडे आहे, तर इतर पाच मतदारसंघात महायुतीकडे आहेत. त्यामुळे कागदावर महायुती महाविकास आघाडीसमोर या निवडणुकीत तग धरू शकेल का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadanvis
Dharashiv Lok Sabha News : धाराशिवसाठी इच्छुक असलेल्या प्रवीणसिंह परदेशींचे मोठे संकेत; म्हणाले, ... तर निवडणूक लढणार

महाविकास आघाडीने उमेदवार जाहीर करून प्रचारही सुरू केला आहे, तर दुसरीकडे महायुतीच्या प्रमुख तिन्ही घटक पक्षांकडून अजूनही दावे-प्रतिदाव्यांचाच खेळ सुरू आहे. त्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये प्रचंड स्पर्धा सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटाचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी लोकसभा लढवण्यास नकार दिल्याचे बोलले जाते.

त्यामुळे उमेदवारीच्या स्पर्धेत असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये समझोता घडवून आणण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. त्यात माणूस भाजपचा, चिन्ह राष्ट्रवादीचे आणि उमेदवार मात्र महायुतीचा असे चित्र दिसू शकते. मुंबई येथील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दिवसभर महायुतीच्या जिल्ह्यातील नेते, पदाधिकाऱ्यांनी ठाण मांडले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadanvis
Dharashiv Loksabha | धाराशिवकर मशाल पेटवून क्रांती घडवणार Omprakash RajeNimbalkar |

रात्री उशिरापर्यंत यावर तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच गावागावांत प्रचारही सुरू केला आहे. मतदानासाठी अवघे 39 दिवस राहिले असताना महायुतीच्या जागेचे त्रांगडे मात्र सुटलेले नाही. त्यामुळे इच्छूकांचा जीव टांगणीला लागला आहे.

Edited By : Umesh Bambare

R

Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadanvis
Dharashiv Loksabha Political News: खासदारांवर तिखट हल्ला चढवत भाजप जिल्हाध्यक्षाने ठोकले शड्डू

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com