Parbhani Loksabha Constituency : महादेव जानकरांची डोकेदुखी वाढवणार? आधी उमेदवारीसाठी संघर्ष, आता...

Mahadev Jankar News : महायुतीने परभणी लोकसभा मतदारसंघात उमेदवाराची घोषणा केलेली नसली, तरी महादेव जानकर यांनाच संधी मिळणार असल्याचे जवळपास निश्चित आहे
Mahadev Jankar
Mahadev JankarSarkarnama
Published on
Updated on

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीने परभणी लोकसभा मतदारसंघात उमेदवाराची घोषणा केलेली नसली, तरी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनाच संधी मिळणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. भारतीय जनता पक्ष, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या प्रमुख पक्षासह अन्य अकरा पक्षांचा समावेश असलेल्या महायुतीची बाजू सक्षम असली तरी नेत्यांमध्ये असणारा विसंवाद जानकर यांना त्रासदायक ठरू शकतो.

परभणी लोकसभा मतदारसंघात भाजपचे दोन आमदार आहेत. जिंतूर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मेघना साकोरे बोर्डीकर, परतूरचे बबनराव लोणीकर तसेच जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचे एकमेव आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे हे गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. मित्रपक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी हे विधान परिषद सदस्य आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Mahadev Jankar
Lok Sabha Election 2024 News : शिवसेना शिंदे गटाच्या आठ उमेदवारांची नावे जाहीर; बारणे, मंडलिक, मानेंना उमेदवारी...

तर पाथरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार मोहन फड यांचेही जानकर यांच्याशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे महायुतीमधील लोकप्रतिनिधीमुळे जानकर यांची बाजू भक्कम असली तरी त्यांच्यामधील बेबनाव मागील अनेक कार्यक्रमांमधून उघड झाला आहे. गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे अद्याप एकदाही महायुतीच्या व्यासपीठावर गेलेले नाहीत. याउलट जिंतूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विजय भांबळे यांची जिंतूरला जाऊन त्यांनी भेट घेतली आहे.

भाजपचे विद्यमान जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे व गुट्टे यांच्यातील राजकीय मतभेद चव्हाट्यावर आलेले आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी व शिवसेना अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांच्यातही राजकीय वादाची पार्श्वभूमी आहे. भारतीय जनता पक्षाच्या जिल्ह्यातील नेत्यांना अजूनही असे वाटते की, परभणी लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचा उमेदवार असावा.

आमदार बबनराव लोणीकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्टपणे सांगितले की, परभणी लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्षा ऐवजी मित्र पक्षाला दिल्यास पुन्हा एकदा शिवसेनेचा उमेदवाराचा विजय होऊ शकतो. यासंदर्भात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी पत्रव्यवहार सुद्धा केलेला आहे.

Mahadev Jankar
Latur Lok Sabha Election: पक्ष प्रवेशाला नकार देणाऱ्या आशा शिंदेंची काँग्रेसलाच साथ

तर शिवसेना परभणी महानगर प्रमुख प्रवीण देशमुख यांनी प्रसिद्धी पत्रकात सांगितले की, परभणी लोकसभा मतदारसंघातील मतदार वर्षानुवर्षे धनुष्यबाण या चिन्हावर मतदान करतो. त्यामुळे परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतच्या उमेदवाराने धनुष्यबाण या पक्षचिन्हावर निवडणूक लढवावी. त्यामुळे महायुती मधील पक्ष एकत्र दिसत असले तरी नेत्यांची तोंड मात्र चार दिशेकडे आहेत. महायुतीचे संभाव्य उमेदवार महादेव जानकर यांना नेत्यांमधील बेबनाव दूर करण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com