maharashtra congress organisational changes Sarkarnama
मराठवाडा

Congress Rules : काँग्रेसमध्ये निष्ठावंतानाच पदं मिळणार! आता 'या' निकषांमध्ये बसत असेल तरच पद वाटपांबाबत होणार विचार

Congress party new rules for positions: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाने तीन वर्षांनी होणाऱ्या लोकसभा आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

Jagdish Pansare

Maharashtra congress news: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसनं तीन वर्षांनी होणाऱ्या लोकसभा आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत पक्षाने अनेकांना पद, मंत्री, आमदार, खासदार, झेडपी अध्यक्ष, सभापती केलं, पण नजिकच्या काळात पक्षाचे उपकार विसरून अनेकांनी संकट काळात साथ सोडली.

हे चित्र पुन्हा पक्षात निर्माण होऊ नये, यासाठी काँग्रेस नेतृत्वाने पक्षाची जबाबदारी आणि पद देताना विशेष काळजी घेतल्याचे दिसून येत आहे. पक्षाचा जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष व इतर तालुका पातळीवर जबाबदारी देताना संबंधित पदासाठी इच्छुक असलेली व्यक्ती ही काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता असला पाहिजे, तीन वर्ष तो पक्षात सक्रीय असणे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणते त्याने या काळात कुठलेही पक्षांतर केलेले नसावे, हे महत्त्वाचे निकष ठरवण्यात आले आहेत.

जेणेकरून पक्षाची धुरा ही प्रामाणिक व निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांच्या हातीच सोपवली गेली पाहिजे. हा निकष काँग्रेसने संपूर्ण राज्यात लावला असून या नव्या निकषानूसारच जिल्हाध्यक्ष व इतर पदाधिकारी नियुक्त केले जाणार आहेत येत्या 21 एप्रिलपर्यंत काँग्रेस नव्या जिल्हाध्यक्षांची नावे घोषित करणार असल्याची माहिती परभणी जिल्ह्यातील पक्षाचे केंद्रीय निरीक्षक अमजतउल्लाह हुसेनी यांनी दिली.

माजी आमदार सुरेश वरपूडकर यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यापासून हे पद रिक्त आहे. काँग्रेस पक्षाच्या संघटन बांधणी मोहिमेंतर्गत लवकरच परभणीसह राज्यातील जिल्हाध्यक्षांच्या नियुकत्या व कार्यकारिणी निवडीची प्रक्रिया राबवली जाणार आहे. पक्षाचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी या सगळ्या प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे सांगितले जाते.

सर्वानुमते ठरणार जिल्हाध्यक्ष

काँग्रेस पक्षाचा नव्याने होणारा जिल्हाध्यक्ष हा सर्व पातळीवर सरस ठरावा यासाठी केवळ पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचीच मते जाणून घेतली जाणार नाहीत. तर त्या त्या जिल्ह्यात काम करणाऱ्या सामाजिक संघटना, संस्था, पत्रकार, मागासवर्गीय संघटना अशा सगळ्यांचेच मत विचारात घेतले जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT