Baramati Bypoll : पोटनिवडणुकीवर पार्थ पवार पहिल्यांदाच बोलले अन् दिला करारा जवाब; म्हणाले, काय त्रास होईल, ते दिसेल...

Parth Pawar statement on Congress : सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते आज बारामतीत दाखल झाले होते. त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही उपस्थित होते.
Parth Pawar, Harshawardhan Sapkal
Parth Pawar, Harshawardhan SapkalSarkarnama
Published on
Updated on

Baramati election news 2026 : बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्याविरोधात काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेस वगळता अन्य सर्वच पक्षांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी आग्रह धरला होता. पण काँग्रेसने माघार घेतली नाही. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत बिनविरोधसाठी प्रयत्न केला जाणार आहे.

काँग्रेसच्या भूमिकेवरून मात्र अनेकांनी टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्यसभेचे नवनियुक्त खासदार पार्थ पवार यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला आहे. आई सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी पार्थ यांनी मीडियाशी संवाद साधताना काँग्रेसला सूचक इशाराच दिला आहे. पोटनिवडणुकीबाबत त्यांनी उघडपणे पहिल्यांदाच भाष्य केले आहे.

काय म्हणाले पार्थ पवार?

पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वासोबत बोलणार का, या प्रश्नावर बोलताना पार्थ पवार म्हणाले, कुणासोबतही बोलणे झालेले नाही. काय करायचं, ते त्यांना कळायला हवे. ते काय करत आहेत, ते सगळ्यांना माहिती आहे. सगळे मोठे लोकं आहेत, सगळ्यांना समजतं, काय चाललंय. त्यांनी विचार केला असेल, त्यांना करू द्या. पण त्यांना नंतर काय त्रास होईल महाराष्ट्रात ते दिसेल, असा संताप पार्थ यांनी व्यक्त केला.

Parth Pawar, Harshawardhan Sapkal
Supreme Court : सुप्रीम कोर्टाचा भाजप सरकारला जोरदार झटका; थेट मुख्यमंत्री अडकणार CBI च्या जाळ्यात, चौकशीचे आदेश

लोक विसरत नाहीत. लोकांच्या मनात दादांविषयी प्रेम आहे. अशा वेळेस एवढ्या मॅच्युअर पक्षाने हा निर्णय घेणे, जिथे एवढे मोठे नेते आहेत, ते अतिशय चुकीचे आहे, अशी नाराजी पार्थ यांनी व्यक्त केली. आपण कोणाला थांबवू शकत नाही. जशी वेळ येते, तसे सामोरे जावे लागते. आम्ही सामोरे जाऊ, असेही पार्थ पवारांनी स्पष्ट केले.  

Parth Pawar, Harshawardhan Sapkal
BJP Politics : भाजपला 46 वर्षांत जे जमलं नाही ते यंदा होणार? विरोधकांना धडकी भरविणारा विजय मिळणार का?

आम्ही कोणाला फोन करणार नाही. जे काय नशिबात लिहिलंय ते बघू. फक्त मला वाईट वाटतंय की, महाराष्ट्रात काँग्रेसचा डाऊनफॉल आहे, असा सूचक इशाराही पार्थ पवार यांनी दिला. दरम्यान, सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते आज बारामतीत दाखल झाले होते. त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com