Bead News : राज्यातील नव्या राजकीय समीकरणानंतर आपण राज्यात आभा घेऊ, असे राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष जेष्ठ नेते शरद पवार म्हणाले आणि आपणही त्या ठिकाणी जाऊन प्रत्युत्तर सभा घेणार असे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जाहीर केले. बीडला शरद पवारांनी सभा घेताच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानेही सभा जाहीर केली. मात्र, ही प्रत्युत्तर सभा नसल्याचेही सांगितले. भली मोठी सभा, गर्दीतून शक्तिप्रदर्शन करून आम्हीच मोठे असल्याचा संदेश भाजपला दिला.
संयोजक कृषी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी भाषणात गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या अपयशबद्दल भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका, जिल्ह्याचे पालकमंत्रिपद लवकरच राष्ट्रवादीला असे सांगून अजित पवार यांनी या पदाची माळ धनंजय मुंडेकडे असेल हे जाहीर करून टाकले तर आतापर्यंतच्या सर्व सांभाच्या गर्दीचे रेकॉर्ड मोडल्याचा आनंद झाला, ह्या वाक्यातून धनंजय मुंडे यांनी यापूर्वी कोणच नेत्यांची एवढी सभा झाली नाही हेही अधोरेखित केले.
रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची बीडला सभा झाली. राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, संयोजक कृषिमंत्री धनंजय मुंडे, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, वैद्यकीय शिकण मंत्री हसन मुश्रीफ, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री संजय बनसोडे, मंत्री भाईदास पाटील आदी दिग्गज मंडळींची उपस्थिती होती.
शरद पवारांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला (जि. नाशिक) येथे सभा घेतली. मात्र, तिथे अजित पवारांऐवजी भुजबळ यांनीच प्रत्यऊत्तर दिले. त्यानंतर दीड महिना मोठ्या पवारांचा दौराही थंडावला. पण, त्यांनी (ता. 17) ऑगस्टला बीडला स्वाभिमानी सभा घेताच अजित पवार गटानेही (ता. 27) ऑगस्टला प्रत्यत्तर सभा जाहीर केली. स्वाभिमानी सभेत शरद पवार यांनी अजित पवार, धनंजय मुंडे यांच्यावर कुठली टिकाच केली नाही. तर प्रत्युत्तर काय द्यायचे म्हणून या सभेला जिल्ह्याचा सन्मान, जिल्ह्याचा विकास आणि जिल्ह्याचे मागासलेपण व दुष्काळ कायम घालवीण्यासाठी सभा असल्याचे जाहीर करण्यात आले. मुळात, शरद पवार गटाला प्रत्युत्तर देण्यापेक्षा तत्कालीन मुख्य प्रतिस्पर्धी व नवा मित्रपक्ष भाजपला ताकद दाखवीन्याची जणू संधीच राष्ट्रवादी अजित पवार गटाला मिळाली.
जिल्ह्यात एकमेव आमदार आणि सत्ताही नसलेल्या संदीप क्षीरसागर यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांची सभा यशस्वी करून दाखवली. त्या सभेहून अजित पवार यांच्या सभेची गर्दी सहाजिकच अधिक अधिक होणारच होती. मात्र, मुद्दा होता तो अलीकडे जिल्ह्यात सत्तेत असलेल्या व मोठा पक्ष असलेल्या भाजपमधील शांततेच्या पार्श्वभूमीवर ही सभा मोठी करून आम्हीच मोठे असल्याचे दाखवीन्याचा. मुळात जिल्ह्यात पूर्वी भाजप - राष्ट्रवादी हे प्रमुख प्रतिस्पर्धी होते. जुन्या युतीमधील शिवसेनेला बिडची एक जागा असे तर आघाडित राष्ट्रवादीने मागच्या निवडणुकीत काँग्रेसचे चिन्हच मतदान पत्रिकेपर्यंत येऊ दिले नव्हते.
आता शिवसेना (Shivsena) फुटीनंतर राष्ट्रवादीत देखील फूट पडली. पण, महायुतीत आणि सत्तेच्या परिघात आणखी एका पक्षाची भर मागच्या दोन महिन्यांपूर्वी पडली. मात्र, यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. या समीकरणाचा पहिला फटका जिल्ह्यातील भाजपला बसलाय हे नाकारता येणार नाही. नव्या समीकरणात, राष्ट्रवादीचे आमदार फुटले असले तरी तीन वर्षांनी सत्तेत आलेल्या भाजपचे ताटच हातचे जात आहे. मूळ आणि कळीचा मुद्दा परळी विधानसभा जगेचा असून आता पालकमंत्रिपद देखील धनंजय मुंडे यांच्याकडे जाणार हे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गटाची सभा आमदार संदीप क्षीरसागर यांनी घेतली. एकटे आमदार, सत्ता नाही, नवखे आमदार अशा त्यांच्या बाजू असतानाही त्यांनी सभा घेऊन आणि यशस्वी देखील करून दाखवली. या सभेत शरद पवारांनी अमरसिंह पंडित वगळता स्थानिक व राज्याच्या नेत्यांवर टीका देखील केली नव्हती. त्यामुळे प्रत्युत्तर द्यायला मुद्दा देखील नव्हता. एकट्या आमदाराच्या विरोधात सत्तेत मंत्री, इतर दोन आमदार अशी बाळासाठाणे असल्याने सभा मोठी तर होणारच होती. त्यामुळे स्वाभिमानी सभेला कालची सभा स्पर्धा नव्हती तर भाजपला ताकद दाखविन्याची संधी या सभेतुन राष्ट्रवादी अजित पवार गटाने साधली.
म्हणूनच संयोजक मुंडे यांनी निक्षून लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड मजूर कल्याण महामंडळ अपयश आणि त्याचकडून मुर्तस्वरूप हे मुद्दे ठळक मांडले. एकीकडे भाजप नेत्यांचे जिल्ह्याकडे दुर्लक्ष होते असल्याने कार्यकर्त्यांमध्ये मरगळ असून राज्यात सत्ता येऊनही वारभराळासून दुसरी फळी आणि कार्यकर्ते उपाशी असताना दीडच महिन्यात राष्ट्रवादीने आपली गाडी सुसाट सोडली आहे. आज जरी दोन्ही पक्ष महायुतीत असले तर भाविष्याचा विचार केला तर एकमेकांचे कट्टर स्पर्धक आहेतच. त्यामुळे या सभेचा खरा विचार भाजपने करावा आणि सभा आयोजनाचा राष्ट्रवादीचा हेतू देखील हाच होता.
Edited by : Amol Jaybhaye
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.