Ajit Pawar On Bhujbal Speech : बीडच्या सभेत स्टेजवर बसलेले अजित पवार म्हणतात, '' भुजबळांचं भाषण मला ऐकूच आलं नाही..''

Maharashtra Politics : '' कुणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत...''
Ajit Pawar - Chhagan Bhujbal
Ajit Pawar - Chhagan Bhujbal Sarkarnama
Published on
Updated on

Pune : शरद पवार यांनी माझ्या येवला मतदारसंघात येऊन माफी मागितली. का तर मला उमेदवारी दिली आणि लोकांनी निवडून दिले. पण गोंदिया ते कोल्हापूर अशा किती ठिकाणी तुम्ही माफी मागणार आहात असा सवाल अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी बीडच्या सभेत उपस्थित करत पवारांवर हल्लाबोल केला होता. तसेच २०१९ ला अजित पवार यांचा शपथविधी झाला, त्यावेळी तुम्ही ती गुगली होती, असं म्हटला. पण गुगलीवर कुणी आपल्याच प्लेअरला बाद करतं का असा घणाघातही छगन भुजबळ यांनी केला होता.

भुजबळांच्या या टीकेवर शरद पवार(Sharad Pawar) गटाकडून प्रतिवार करण्यात येत आहे. ठाण्यात दोन्हीही गटाने आक्रमक होत जितेंद्र आव्हाड आणि भुजबळांचे पुतळेही जाळले. पण एकीकडे भुजबळांच्या भाषणानंतर राष्ट्रवादीतलं वातावरण तापलं असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भुजबळांच्या भाषणावर केलेल्या विधानामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

Ajit Pawar - Chhagan Bhujbal
Jalgaon Politics : राज्यात गुलाबराव पाटील सर्वात भ्रष्टाचारी मंत्री : गुलाबराव देवकरांनी डागली तोफ

आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने पुण्यामध्ये पोलीस प्रशासनासोबत एक बैठक आयोजित करण्यात आलेली होती. या बैठकीनंतर अजित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बीडमधील छगन भुजबळां(Chhagan Bhujbal)च्या भाषणावर प्रतिक्रिया दिली. पवार म्हणाले, भुजबळ यांनी केलेलं भाषण मला ऐकूच आलं नाही. मी ज्या ठिकाणी बसलो होतो, तेथे भाषणाचा आवाज ऐकू येत नव्हता. कार्यक्रमानंतर मोबाईलवर काही व्हिडिओ माझ्या पाहण्यात आले. माझं स्पष्ट मत आहे की, कुणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, अशी काळजी नेत्यांनी घ्यायला हवी असं मला वाटतं असेही ते म्हणाले.

''...म्हणून मी पुन्हा पुन्हा बैठक घेतो !''

दरम्यान, तुम्ही पालकमंत्री असताना दर आठवड्याला बैठका घेत होत होत्या पण चंद्रकांतदादा घेत नाहीत असा प्रश्नावर अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, मला वाटतं की, माझ्या बैठकीचा परिणाम सात दिवस राहणार म्हणून मी पुन्हा पुन्हा बैठक घेतो. काहींना वाटतं, आपल्या बैठकीचा परिणाम एक ते दोन महिने राहणार. त्यामुळे ते तेवढ्या दिवसांच्या फरकाने बैठका घेतात अशी मिश्किल टिप्पणीही पवारांनी यावेळी केली.

Ajit Pawar - Chhagan Bhujbal
Wadettivar Took Notice : ठाणेदाराने शेतकऱ्याला केलेल्या मारहाणीची विरोधी पक्षनेत्यांनी घेतली दखल, म्हणाले…

'' तुझ्या तोंडात साखर पडो!''

पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आहेत की अजित पवार? असा प्रश्न उपस्थित होत होता. त्यावरुन पत्रकारांनी तुमच्याकडे सुपर पालकमंत्री म्हणून बघितलं जात आहे, असं विचारलं. त्यावर अजित पवार म्हणाले की, तुझ्या तोंडात साखर पडो! असं म्हणत पालकमंत्रिपदावर अधिक भाष्य करणं टाळलं.

पवारांवर टीका करताना भुजबळ काय म्हणाले होते..?

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी बीडच्या सभेत शरद पवारांवर सडकून टीका केली. ते म्हणाले, शरद पवार यांची सभा इथं झाली. पहिली सभा येवल्यात झाली. दुसरी सभा बीडला झाली. तिसरा नंबर हसन मुश्रीफ म्हणजेच कोल्हापूरला झाली. आंबेगावला सभा होणार सांगितलं पण झाली नाही. सगळीकडून गाडी बारामतीला आली की अजितदादा आमचे नेते आहेत, असं सुप्रियाताई सुळे म्हणणार, शरद पवार म्हणणार तर मग उपमुख्यमंत्री अजित पवार आमचे नेते आहेत म्हणा, आशीर्वाद देऊन वाद मिटवा, असं छगन भुजबळ म्हणाले.

Ajit Pawar - Chhagan Bhujbal
Thane NCP Political News : राष्ट्रवादीत वाद पेटला ; शरद पवार गटाने भुजबळांचा तर अजित पवार गटाने आव्हाडांचा पुतळा जाळला

''...तर मुख्यमंत्री झालो असतो!''

ईडीच्या कारवाईला घाबरले म्हणून गेलो नाही, घाबरलो नाही, तुमच्यासोबत राहिलो. १९९१ पासून तुमच्यासोबत राहिलो. काँग्रेसमधून बाहेर काढलं तेव्हा तुमच्यासोबत उभा राहिलो होतं, असं भुजबळ म्हणाले. काँग्रेस पक्ष फुटला नसता तर मुख्यमंत्री झालो असतो, असं भुजबळ म्हणाले. तुम्ही वैयक्तिक गोष्टींवर बोलायचं नाही,असं सांगितलं होतं. पण, अजित पवारांना धनंजय मुंडे यांचा इतिहास सांगायला सांगता, तुम्ही कुठून कुठे आलात , असा सवाल छगन भुजबळ यांनी केला.

''...पण गृहमंत्रिपदाचा राजीनामा घेतला गेला !''

२००३ ला २३ डिसेंबर रोजी गृहमंत्रिपदाचा राजीनामा का घेतला होता. तेलगीचं प्रकरण होतं, त्याला अटक मी केली. मोक्का लावला होता. काही लोकांनी आरोप केले आणि राजीनामा द्यायला सांगितला. भुजबळांचा राजीनामा घेऊ नका असा फोन आला होता, पण राजीनामा घेतला गेला, असा सवाल भुजबळांनी केला.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com