Jalgaon Politics : राज्यात गुलाबराव पाटील सर्वात भ्रष्टाचारी मंत्री : गुलाबराव देवकरांनी डागली तोफ

Gulabrao Patil & Gulabrao Deokar News : जळगाव जिल्ह्यात राजकारण तापले
Gulabrao Patil, Gulabrao Deokar
Gulabrao Patil, Gulabrao DeokarSarkarnama

Jalgaon News : जिल्ह्यातील प्रत्येक कामात दहा टक्के कमीशन तसेच पाणी योजनेतील राज्यातील सर्व निविदेत कमीशन, दारू तसेच वाळू व्यवसायातूनही कमीशन घेणारे राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील राज्यातील सर्वात भ्रष्टाचारी मंत्री आहेत. असा गंभीर आरोप राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते गुलाबराव देवकर (Gulabrao Deokar) यांनी केला आहे.

जळगाव येथे पत्रकारांशी देवकर बोलत होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) नेते शरद पवार यांच्या पाच सप्टेंबर रोजी होणाऱ्या जळगाव दौऱ्यानिमित्त एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गुलाबराव देवकर यांनी गुलाबराव पाटलांवर (Gulabrao Patil) सणसणाटी आरोप केले.

Gulabrao Patil, Gulabrao Deokar
Ahmednagar Politics: राजनाथ सिंह, मुख्यमंत्री शिंदेंचा नगर दौरा; पद्मश्री विखे साहित्य पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावणार

देवकर यांनी मंत्री असतांनाही काहीही केले नाही, उलट त्यांनी ठेवलेल खरकट आम्ही साफ करीत आहोत. अशी टिकाही गुलाबराव पाटील यांनी केली होती. त्या टिकेला उत्तर देतांना देवकर म्हणाले, आपण मंत्री असतांना धरणगावात उड्डाण पूल केला. लांडोरखोरी उद्यानाचे काम केले, कवयित्री बहिणाबाई चौधरी, बालकवी ठोंबरे यांच्या स्मारकाचे काम सुरू केले. मात्र, गुलाबराव पाटील आज मंत्री आहेत. कायम लक्षात रहावे असे कोणतेही ठोस काम त्यांनी केलेले नाही. त्यांनी कोणते काम केले आहे, हे जनतेला दाखवून द्यावे, असे आव्हणनही त्यांनी दिले.

गुलाबराव पाटील हे राज्यातील सर्वात भ्रष्टाचारी मंत्री असल्याचा आरोप देवकर यांनी केला. ते म्हणाले, जिल्ह्यातील प्रत्येक कामात दहा टक्के कमीशन घेत आहेत. या शिवाय पाणी पुरवठा योजनेच्या राज्यातील प्रत्येक निविदेमध्ये ते दहा टक्के कमीशन घेत असतात. जिल्ह्यातील वाळू तसेच दारू व्यवसायतही त्यांचे कमीशन असते.

Gulabrao Patil, Gulabrao Deokar
Wadettivar Took Notice : ठाणेदाराने शेतकऱ्याला केलेल्या मारहाणीची विरोधी पक्षनेत्यांनी घेतली दखल, म्हणाले…

मी राज्याच्या मंत्री होतो, गुलाबराव पाटील राज्याचे मंत्री आहेत. ते म्हणतत, मी भ्रष्टाचार केला आहे. तर दोघांच्या संपत्त्तीचे मोजमाप करा, असे खुले आव्हाणच देवकर यांनी पाटील यांना दिले. ते म्हणतात मी सालदाराचा मुलगा आहे, मग आता एवढी संपत्ती कशी आली हे त्यांनी सांगावे, असेही देवकर म्हणाले.

प्रलोभने दाखवून लोकांना फोडतायेत

गुलाबराव पाटील यांच्याकडे जाण्यास कोणीही तयार नाही, असा दावा देवकर यांनी केला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तसेच शरद पवार (Sharad Pawar) गटातील राष्ट्रवादीच्या लोकांना ते प्रलोभने दाखवून फोडत आहेत. आगामी काळात जनता गुलाबराव पाटील यांना निश्‍चित त्यांची जागा दाखवून देईन, असा ईशाराही देवकर यांनी दिला.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com