Posters in Chhatrapati Sambhajinagar hail Maharashtra CM Devendra Fadnavis as BJP’s “Grandmaster,” symbolizing strategic political victories over opposition parties. Sarkarnama
मराठवाडा

Devendra Fadnavis : चाणक्य, देवाभाऊनंतर आता फडणवीस यांना 'ग्रँडमास्टर'म्हणत भाजपकडून कौतुक!

BJP Grandmaster Maharashtra CM : महापालिका निवडणुकांतील यशानंतर भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस यांना ‘ग्रँडमास्टर’ संबोधत पोस्टरबाजी होत असून त्यांच्या नेतृत्वाचे कौतुक होत आहे.

Jagdish Pansare

BJP News : राज्याचे मुख्यमंत्री तथा भाजपचे राज्यातील प्रमुख नेते असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर सध्या पक्षातील नेते, मंत्री, आमदार, खासदार एवढेच काय? तर सामान्य भाजप कार्यकर्ताही कमालीचा खूष आहे. नगरपालिका, नगरपंचायतीनंतर महापालिकेतही भाजप हा नंबर एकचा पक्ष ठरला. अर्थात याचे श्रेय भाजपचे स्थानिक नेते हे देवाभाऊंना देतात.

छत्रपती संभाजीनगर महापालिकेत पंचवीस वर्षानंतर भाजपला स्वबळावर बहुमतापर्यंत पोचता आले. याचे श्रेयही देवेंद्र फडणवीस यांनाच दिले जात आहे. भाजपमधील 'चाणक्य' अशी देशपातळीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची तर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांची ओळख आहे. हे दोन्ही राजकारणात बाजी पलटवण्यात माहीर मानले जातात.

महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपने विरोधकांचे सगळे डाव उधळून सत्तेच्या सरी पटात बाजी मारली आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक, अभिनंदन करणारे बॅनर लावण्यात आले आहेत. ज्यामध्ये बुद्धीबळाच्या पटावरील इतर सोंगट्या म्हणजे विरोधक नेस्तनाबूत झालेले दर्शवण्यात आलेले आहेत. या बुद्धीबळाच्या पटावरील राजा म्हणजेच ग्रँडमास्टर हे देवेंद्र फडणवीस हेच आहेत, असे यातून अधोरेखित करण्यात आले आहे.

भाजपचे स्थानिक नेते, संस्थाचालक बसवराज मंगरुळे यांनी ही पोस्टरबाजी शहरात ठिकठिकाणी केली आहे. बसवराज मंगरुळे हे आगामी मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी भाजपकडून इच्छूक आहेत. जयसिंगराव गायकवाड, श्रीकांत जोशी यांच्यानंतर भाजपला या आपल्या पारंपारिक मतदारसंघावर पुन्हा पकड मिळवता आलेली नाही. अशावेळी नव्या चेहऱ्याला उमेदवारी देत भाजप मराठवाडा पदवीधरची जागा पुन्हा खेचू पाहत आहे.

मंगरुळे यांनी अशा पद्धतीने पोस्टरबाजी करत आपली दावेदारीही पक्की करण्याचा डाव खेळला आहे. पण ज्या देवाभाऊंना मंगरुळे यांनी ग्रँडमास्टर ठरवल आहे, त्यांची एखादी चाल मंगरुळे यानांच 'चेकमेट' देऊ शकते. हे ही त्यांनी ध्यानात ठेवावे. एकूणच काय, तर भाजपचा प्रत्येक पदाधिकारी, नेता हा सध्या देवाभाऊंच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT