Eknath shinde, Devendra Fadanvis Sarkarnama
मराठवाडा

Shivsena Hearing : 'शिवसेना ठाकरेंचीच...'; सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर CM फडणवीसांची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले "2024 चा कौल पाहता न्यायालय तसाच निर्णय..."

Devendra Fadnavis on Shivsena : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना कोणाची याची सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू असतानाच मोठं वक्तव्य केलं आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे यांची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांचा आहे, असे विधान केले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला आहे.

उमेश वाघमारे, Jagdish Pansare

Jalna News, 14 Aug : शिवसेना कोणाची? याचा वाद सुप्रीम कोर्टात सुरू आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जेष्ठविधीज्ञ कपिल सिब्बल निवडणूक आयोगाची पिसे काढत आहेत, या सुनावणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जालन्यात पुन्हा एकदा शिवसेना कोणाची यावर भाष्य केले आहे.

शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवारांचाच असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार यांचा असल्याचा कौल 2024 च्या निवडणुकीमध्ये लोक न्यायालयाने दिला आहे. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाचाही हाच निकाल लागेल, अशी अपेक्षा असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

खासदार सुप्रिया सुळे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे यांची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांचा आहे, असे विधान केले होते. यावर देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार करत सुप्रिया सुळे काहीही म्हणू शकतात. परंतु, हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाच्या विचाराधीन आहे. यावर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

परंतु, 2024 च्या निवडणुकीत जनतेने दिलेला कौल पाहता सर्वोच्च न्यायालयदेखील असाच निर्णय देईल, अशी अपेक्षा आहे. दरम्यान, केंद्र शासनाने जातनिहाय जनगणना घोषित केलेली आहे. त्यानुसार तिचे टप्पे असतात. त्यानुसार ती होईल. आता त्याची कार्यवाही सुरू होईल. मागील अनेक वर्षांपासून असलेली मागणी आज मोदी सरकारने पूर्ण केली आहे, असेही फडणवीस यांनी म्हटले.

शरद पवारसाहेब ज्येष्ठ नेते आहेत. नेहमी महाराष्ट्राच्या हिताचा विचार करतात. त्यांच्यापर्यंत चुकीची माहिती जाऊ नये, त्यामुळे मी त्यांच्या ट्विटला उत्तर दिले. महाराष्ट्रात सर्वाधिक कंपन्या आहेत. परंतु, ज्या कंपन्या कधीच सुरू झाल्या नाहीत, अशा कंपन्यांची आकडेवारी देऊन काही लोक फसवेगिरी करतात. परंतु, माझ्या ट्विटनंतर हे समोर आले. चाकणचा जो विषय आहे, तो गंभीर असून आम्ही त्याची दखल घेतली आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.

राहुल गांधी यांनी छिछोरेपणा केला

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जो छिछोरेपणा करून देशाच्या पंतप्रधानांचा अपमान केला. याच वेळी इटलीच्या महिला राष्ट्रप्रमुखाचा खालच्या दर्जाला जाऊन त्यांनी अपमान केला. या देशांमध्ये असा छिछोरेपणा केला जात नव्हता. गल्लीतील नेते देखील असे वागत नाहीत. राहुल गांधी आणि संदीप दीक्षित यांनी राष्ट्राची माफी मागितली पाहिजे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT