Satish Bhosale, Devendra Fadnavis Sarkarnama
मराठवाडा

Satish Bhosale Arrest : "खोक्या असो नाही तर ठोक्या..."; सतीश भोसले अटक अन् घरावरील बुलडोजर कारवाईनंतर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Devendra Fadnavis On Satish Bhosale : सतीश भोसले उर्फ खोक्याला गुरूवारी (ता.१३) बीड पोलिसांनी उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथून ताब्यात घेतलं. त्यानंतर वनविभागाने देखील त्याच्या विरोधात मोहीम उघडली आहे. खोक्याला अटक केल्यानंतर काल त्याच्या घरावरही वनविभागाने बुलडोजर चालवला आहे.

Jagdish Patil

Beed News, 14 Feb : सतीश भोसले (Satish Bhosale) उर्फ खोक्याला गुरूवारी (ता.१३) बीड पोलिसांनी उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथून ताब्यात घेतलं. त्यानंतर वनविभागाने देखील त्याच्या विरोधात मोहीम उघडली आहे. खोक्याला अटक केल्यानंतर काल त्याच्या घरावरही वनविभागाने बुलडोजर चालवला आहे.

शिरूर कासार शहरापासून काही अंतरावर असलेल्या वनविभागाच्या (Forest Department) जमिनीवर वैदू वस्ती वसलेली होती. त्या ठिकाणी खोक्याने घर बांधलं होतं. ग्लास हाऊस असं त्याच्या घराचं नाव होतं. मात्र, हे घर अनधिकृत असल्याने वनविभागाने गुरूवारी त्याच्या घरावर बुलडोजर चालवत कारवाई केली.

तर सतीश भोसलेच्या घरावर अतिक्रमणाची कारवाई केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले. "खोक्या असो नाही तर ठोक्या असो, आम्ही कोणालाही सोडणार नाही. सगळ्यांना ठोकणार.", असं म्हणत त्यांनी कोणत्याही आरोपीला पाठीशी घातलं जाणार नसल्याचं स्पष्ट केलं.

सतीश भोसले हा भाजप आमदार सुरेश धस यांचा कट्टर आणि जवळचा कार्यकर्ता समजला जातो. त्यामुळे त्याच्यावर कारवाई केली जाणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी आपण कोणालाही सोडणार नसल्याचं वक्तव्य केलं आहे.

दरम्यान, सतीश भोसले उर्फ खोक्याला घेऊन बीड पोलिस छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहेत. प्रयागराजमध्ये अटक केल्यानंतर काल रात्री बीड पोलीस भोसलेला ताब्यात घेऊन आज पहाटे छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावर दाखल झाले. तिथून आता पोलिस त्याला बीडला घेऊन निघाले आहेत. शिवाय आजच त्याला शिरूर न्यायालयात हजर देखील केलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT