
Supriya Sule remarks on BJP : लोकसभा आणि नंतर विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या सातत्याने भाजप आणि भाजपच्या नेत्यांवर आक्रमकपणे टीका करताना पाहायला मिळाल्या आहेत. मात्र गुरूवारी पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी मूळ भाजपच्या असलेल्या लोकांचं कौतुक केल्याने सर्वांचे डोळे विस्फारले आहेत. त्यामुळे आगामी काळात काही आणखी राजकीय गणित बदलताना पाहायला मिळणार का? असे कयास लावण्यात येत आहेत.
पुणे दौऱ्यावर असताना खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी मतदार संघातील रस्त्यांच्या कामाबाबत पाहणी केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी विविध विषयांवर भाष्य केले. सुप्रिया सुळे म्हणाल्या, आजकाल वर्दीची भीती गुन्हेगारांना राहिलेली नाही. अगदी वाल्मीक कराडने देखील व्हिडिओ टाकला आणि मी येतोय असं सांगितलं आणि त्यानंतर तो सरेंडर झाला.हा महाराष्ट्राच्या पोलिसांचा वाल्मीक कराडने केलेला अपमान आहे.
महाराष्ट्रात सगळीकडेच गुन्हेगारी वाढली असल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्यामधील डेटा पाहिल्यानंतर देखील समजतं की किती मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे. काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत(Shivsena) प्रवेश का केला? हे सर्वांनाच माहिती आहे. माध्यमांमध्ये काही बातम्या आल्या असून तुम्हालाच माझ्यापेक्षा चांगलं माहिती की नेमका प्रवेश का? केला आहे. असं सुळे म्हणाल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील(jayant Patil) यांच्या पक्षप्रवेशाबाबत सातत्याने चर्चा होताना पाहायला मिळत आहेत. याबाबत विचारला असता सुप्रिया सुळे म्हणाल्या,मी इकडे यायच्या अगोदर जयंत पाटलांना एक तास भेटून आली आहे .राज्याच्या दौऱ्यांबाबत नियोजन आम्ही केलंआहे. ,मात्र इतकी मोठी संघटना, इतका मोठा पक्ष असून त्यांना आजही जयंत पाटील हवेहवेसे वाटताहेत ही खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे. असा टोला त्यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लगावला.
राज्यातील अधिवेशन काळामध्ये आमदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, महाराष्ट्रातील काही मंत्र्यांनी त्यांच्या सरकारच्या काळात झालेल्या भ्रष्टाचाराबाबत वाच्यता केली आहे. भेसळुक्त पनीर बरोबरच प्रश्न विचारण्यासाठी घेतले जाणाऱ्या पैशाबाबत देखील सरकारमधील आमदारांनीच प्रश्न मांडला आहे. सत्ताधारी पक्षांमध्ये देखील अजूनही काही चांगली लोकं आहेत. जे ओरिजनल भाजपवाले आहेत. ओरिजनल बीजेपीवाले जे चांगले लोक आहेत, सुसंस्कृत आहेत. ज्यांना भारताबद्दल महाराष्ट्राबद्दल आज प्रेम आहे. जे कॉम्प्रोमाइज नाही आहेत ते राज्याच्या हिताचे प्रश्न मांडत आहे. विरोधक असले तरी त्यांचं स्वागत करते असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
(Edited by- Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.