Eknath Khadse News : नातीसोबत छेडछाड, सातपैकी 3 आरोपी अजूनही मोकाट; एकनाथ खडसेंचा पोलिसांसह 'आका'वर गंभीर आरोप

Eknath Khadse On Budget: निवडणुकीच्या काळात महायुतीनं अनेक आश्वासनं दिली होती. लाडक्या बहिणींना 2100 रुपये तातडीने देणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र, आता पैसे देण्यासाठी टाळाटाळ करत आहेत, असा हल्लाबोलही त्यांनी यावेळी केला.
eknath khadse raksha khadse
eknath khadse raksha khadsesarkarnama
Published on
Updated on

Jalgaon News : केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या कन्येची छेडछाड आणि विनयभंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. एका केंद्रीय मंत्र्याच्याच मुलीबाबत हा प्रकार घडल्यानं महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे. यातच राजकीय वरदहस्त असलेल्या आणि याबाबत सराईत अशी प्रतिमा असलेल्या कार्यकर्त्यांनी हे केल्यानं संतापजनक प्रकार पोलिसांकडूनही घडल्याचे समोर आले होते. या घटनेवर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) पोलिसांसह स्थानिक 'आका'वर गंभीर आरोप केले आहेत

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांनी मीडियाशी संवाद साधला.याचवेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेवरुन महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली. तसेच केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंची (Raksha Khadse) कन्या आणि त्यांची नातीच्या छेडछाड प्रकरणावरही कठोर शब्दांत ताशेरे ओढले.

खडसे म्हणाले, नातीच्या छेडछाडीच्या घटनेला 10 दिवस झाले आहेत. ही घटना घडल्यानंतर आत्तापर्यंत पोलिसांना फरार आरोपींचा शोध घेता आलेला नाही. चार जणांना अटक केलेली आहे. पण या घटनेतील तीन प्रमुख आरोपी अजूनही फरार आहेत.ते फरार झालेले नाहीत, इथले जे आका आहेत. राजकीय व्यक्ती आहेत. त्यांच्या पंखाखाली ते लपलेले आहेत. त्यांच्या पाठीमागे राजकीय शक्तीच असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

eknath khadse raksha khadse
Abu Azmi : अबू आझमींचं धुळवडीच्या आदल्या दिवशीच खळबळजनक विधान; म्हणाले, मुद्दाम अंगावर अन् मशिदीवर रंग...

तसेच या छेडछाड प्रकरणात जे आरोपी फरार आहेत,त्यांना स्थानिक नेत्याचं संरक्षण आहे. त्याचबरोबर पोलिसांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळेच पोलिस त्यांना जाणीवपूर्वक अटक करण्यास टाळाटाळ करत असल्याचा गंभीर आरोपही आमदार एकनाथ खडसे यांनी यावेळी केला.

केंद्रीय मंत्री सत्तेत असल्या तरी राज्याचं गृह खात राज्याकडेच आहे.याठिकाणी गृहखात्याने पूर्ण प्रयत्न करुन सुद्धा आरोपी मिळत नाहीत, याचा अर्थ असा की, स्थानिक पोलीस अपयशी आहेत. या घटनेतील सगळ्या आरोपींची पार्श्वभूमी गुन्हेगारीचीच आहे.त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याचंही त्यांनी म्हटलं.

eknath khadse raksha khadse
Uddhav Thackeray And Raj Thackeray : मोठी बातमी! मराठी माणसाची इच्छा पूर्ण होणार, राज अन् उद्धव ठाकरे एकत्र येणार? कुणी टाकलं पुढं पाऊल?

याचदरम्यान ,त्यांनी राज्यातील चित्र पाहिलं तर राजकारणाचं गुन्हेगारीकरण होतं आहे की, काय असं वाटतंय. पोलीस यंत्रणा अपयशी ठरत असल्याचा आरोपही त्यांनी एकनाथ खडसेंनी यावेळी केला. निवडणुकीच्या काळात महायुतीनं अनेक आश्वासनं दिली होती. लाडक्या बहीणांना 2100 रुपये तातडीने देणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र, आता पैसे देण्यासाठी टाळाटाळ करत आहेत, असा हल्लाबोलही त्यांनी यावेळी केला.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच मांडलेल्या अर्थसंकल्पावरही त्यांनी एकनाथ खडसेंनी टीकेची झोड उठवली. ते म्हणाले,राज्यावर आठ लाख कोटींचं कर्ज देणे थकलेले आहेत. पगार देण्यासाठी सुद्धा राज्याकडे पैसे नाहीत. तसेच जाहीर झालेला अर्थसंकल्प जनतेच्या दृष्टीनं हिताचा नाही.त्यात शेतकऱ्यांसाठी कोणतीही तरतूदी नसल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com