Santosh Deshmukh Krishna Andhale News Sarkarnama
मराठवाडा

Dhananjay Deshmukh News : कृष्णा आंधळे दोनशे दिवसांपासून फरार, अटकेसाठी धनंजय देशमुख कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत!

Accused Krishna Andhale remains absconding for over 200 days. Dhananjay Deshmukh pushes for his arrest and prepares to take strict action. Major development in the ongoing case. : कृष्णा आंधळे फरार असल्याने त्याच्याकडून आमच्या जीविताला धोका असल्याचे देशमुख यांनी म्हटले आहे.

Jagdish Pansare

Sarpanch Deshmukh Case : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण आणि त्यानंतर झालेल्या निर्घृण हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपींना अटक होऊन त्यांच्यावर मकोका अंतर्गत गुन्हे दाखल होऊन प्रकरणाची विशेष न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मात्र अजूनही या हत्या प्रकरणातील एक आरोपी कृष्णा आंधळे हा तब्बल 204 दिवसापासून फरार आहे. त्याच्याकडून आमच्या जिविताला धोका असून त्याला तात्काळ अटक करा, नाहीत मी कठोर निर्णय घेईल, असा इशारा संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी दिला आहे

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्यासह आठ आरोपींना अटक करून त्यांच्यावर बीडच्या विशेष न्यायालयात खटला सुरू आहे. या प्रकरणात पुढील सुनावणी येत्या 7 जुलै रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर अद्याप फरार असलेल्या कृष्णा आंधळे या आरोपीच्या अटकेसाठी धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. कृष्णा आंधळे फरार असल्याने त्याच्याकडून आमच्या जीविताला धोका असल्याचे देशमुख यांनी म्हटले आहे. आंधळे याच्या अटकेसाठी आपण कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणाला 6 महिने उलटून गेले. मात्र अद्याप या प्रकरणातला एक आरोपी कृष्णा आंधळे पोलीसांना सापडलेला नाही. त्याला शोधण्यासाठी पोलीसांकडून फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत, असेही बोलले जाते. (Beed News) दरम्यान, विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना फरार कृष्णा आंधळेच्या अटकेची मागणी धनंजय देशमुख यांच्याकडून केली जात आहे. कृष्णा आंधळेला अटक करा ही आमची वारंवार मागणी आहे. जेल प्रशासनाकडून मागील काही दिवसांपासून अटकेत असलेल्या आरोपींना दिली जाणारी व्हीआयपी ट्रीटमेंट बघता आरोपींना वेगवेगळ्या कारागृहात पाठवावं ही आमची मागणी होती.

असं सगळं असताना बीड कोर्टात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह असलेल्या गाड्या, पदाधिकारी, आरोपींचे समर्थन करणारे लोक मोठ्या प्रमाणात येतात. कुठेतरी देशमुख कुटुंबावर दबाव निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहेत. भीतीयुक्त वातावरण तयार करण्याचा प्रयत्न सातत्याने आरोपींच्या समर्थकांकडून केला जात आहे. कुठल्याही प्रकरणातील आरोपी जेर बंद होतात मात्र देशमुख हत्या प्रकरणातील कृष्णा आंधळे 204 दिवसांपासून फरार आहे, तो पोलीसांना का सापडत नाही? असा सवाल संतोष देशमुख यांनी उपस्थित केला.

त्याच्यापासून आमच्या जीविताला धोका आहे. त्यामुळे लवकरात लवकर कृष्णा आंधळेला अटक करण्यासाठी मी कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. याची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्रशासनाची असेल. माझ्या मागणीची गंभीर दखल घ्यावी, असे आवाहनही धनंजय देशमुख यांनी केले आहे. 9 डिसेंबर 2024 रोजी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT