Dhananjay Munde  Sarkarnama
मराठवाडा

Dhananjay Munde News : धनंजय मुंडे 'त्या' प्रकरणात अखेर दोषमुक्त!

Dhananjay Munde Acquitted : अंबाजोगाई येथील अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी यांनी धनंजय मुंडेंसह तिघांना दोषमुक्त केले आहे.

Dattatrya Deshmukh

Ambajogai News : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते असताना विविध आरोपांमुळे अडचणीत आलेल्या धनंजय मुंडे यांना न्यायालयाने दोषमुक्त केले आहे. अंबाजोगाईतील पूस येथील जगमित्र साखर कारखान्यासाठी मुंजा गित्ते यांच्या जमीन खरेदीबाबत धनंजय मुंडे यांच्यासह वाल्मिक कराड तसेच सूर्यभान मुंडे यांच्यावर आरोप होते. मात्र आता अंबाजोगाई येथील अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी यांनी या तिघांना दोषमुक्त केले.

मुंजा गित्ते नामक एका शेतकऱ्याने पूस कारखान्यासाठी कमी पैशात जमीन बळकावली, 40 लाखांचे धनादेश वटले नाही, नोकरी लावण्याचे आश्वासन दिले असे विविध आरोप धनंजय मुंडे यांच्यावर केले होते. अगदी, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी देखील या प्रकरणात उडी मारली होती. मुंजा गित्ते व अन्य काही शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून 2018 साली बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

इकडे विरोधी पक्षनेते म्हणून सरकारवर तुटून पडणारे धनंजय मुंडे या फसवणुकीच्या आरोपामुळे पुरते घेरले होते. त्यानंतर पोलिसांनी याबाबत तपास करून अंबाजोगाई न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. सुनावणीनंतर न्यायालयाने मुंडे व त्यांच्या सहकाऱ्यांना दोषमुक्त केले. त्यांच्यावतीने वकील अशोक कवडे यांनी काम पाहिले.

 आता अजित पवार गटाकडून मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकसभा प्रचार प्रमुखपदी धनंजय मुंडे यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा सुनील तटकरे यांनी केली. धनंजय मुंडे हे राज्याचे कृषीमंत्री असून राष्ट्रवादी काँग्रेसमधील आक्रमक नेते आणि मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखले जातात.

अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याचं मिशन आपण हाती घेतलं असून 2024 साली आपल्याला त्यांना मुख्यमंत्री करायचं आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत उभे राहणारे आणि पडद्यामागे असणारे, अशा सर्वांनी आपली जबाबदारी व्यवस्थितपणे काम करा. तेव्हाच 2024 मध्ये अजित पवार मुख्यमंत्री होतील. असं मोठं विधान धनंजय मुंडे यांनी नुकतच पक्षाच्या मेळाव्यात केलं आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT