Parbhani Congress News: 'हायकमांड' भाजपमध्ये, सुरेश वरपूडकर मात्र काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ...

Suresh Ambadasrao Warpudkar Politics : धर्मनिरपेक्ष नेते अशी प्रतिमा असल्याने जिल्ह्यातील दलित-मुस्लीम मतदारांत वरपूडकर यांचा प्रभाव आहे.
Ashok Chavan
Ashok ChavanSarkarnama

Parbhani News : काँग्रेस पक्षात वर्षानुवर्षापासून हायकमांड संस्कृती जोपासली जाते. हायकमांड ठरवतील तोच अखेरचा शब्द मानला जातो. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा मराठवाड्यात मोठा प्रभाव आहे. त्यांनी काँग्रेसचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांची मात्र यामुळे मोठी अडचण होत आहे. यातील काहीजणांनी चव्हाण यांच्याशी निष्ठा ठेवून त्यांच्यासोबत जाण्याचा निर्धार व्यक्त केला. तर काही लोकप्रतिनिधी मात्र अजूनही पक्षाशी एकनिष्ठ आहेत.

मराठवाड्यातील अनेक नेत्यांनी केंद्र तसेच राज्य पातळीवर नेतृत्व केले. परंतु ज्यांच्या नेतृत्वाला मराठवाड्यातील जनतेने स्वीकारले असे नेते म्हणजे विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) , गोपीनाथ मुंडे आणि अशोक चव्हाण. माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र असलेले अशोक चव्हाण यांनी कॉंग्रेसमध्ये असताना दोन वेळा राज्याचे मुख्यमंत्रिपद भूषवले. तसेच पक्षाचे ते प्रदेशाध्यक्ष, खासदारही होते. कॉंग्रेस पक्षाच्या राज्यातील प्रमुख नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होता.

Ashok Chavan
AIMIM Imtiyaz Jaleel News : 'आदमी दो और सवाल, छह सौ चालीस..' लोकसभेत आवाज 'एमआयएम'चाच...

विशेषतः त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राज्यातील अनेक नेत्यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यापैकी परभणी जिल्ह्यातील महत्वाचे नाव म्हणजे पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार व पक्षाचे मुख्य प्रतोद सुरेश वरपूडकर. वरपूडकर यांनी कायमच परभणी जिल्ह्याचे राजकरण स्वत: भोवती केंद्रित ठेवले. शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या परभणी लोकसभा मतदारसंघात शिवसेना उमेदवाराचा पराभव करण्याचा विक्रम सुरेश वरपूडकर यांच्या नावावर आहे

काँग्रेस पक्षाकडून राजकीय कारकीर्द गाजवलेल्या वरपूडकरांनी सिंगणापूर विधानसभा मतदारसंघातून आमदारकी मिळवली. तसेच राज्यमंत्रीपदही भूषवले. 1999 मध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना केली आणि परभणी जिल्ह्यात सर्वात प्रथम सुरेश वरपूडकर यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांना साथ देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आजही ते परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आहेत. परभणी महानगरपालिका त्यांच्या ताब्यात होती. तसेच परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही त्यांचे वर्चस्व आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत वरपूडकर यांनी अशोक चव्हाण यांच्याशी भेटून काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांना पाथरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीसुध्दा मिळाली. मात्र, त्यांना विजयाने हुलकावणी दिली. 2019 मध्ये मात्र त्यांनी विजय मिळवत विधानसभेत प्रवेश केला. वरपूडकर यांचे हायकमांड असलेले अशोक चव्हाण यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. ते चव्हाण समर्थक असल्याने चव्हाण यांच्यासोबत काँग्रेस सोडणाऱ्या आमदारात वरपूडकर यांचेही नाव घेतले जाऊ लागले. मात्र वरपूडकर यांनी भूमिका स्पष्ट करत मी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहे असे जाहीर केले.

धर्मनिरपेक्ष नेते अशी प्रतिमा असल्याने जिल्ह्यातील दलित-मुस्लीम मतदारात वरपूडकर यांचा प्रभाव आहे. त्यामुळे चव्हाण यांच्यासोबत भाजपमध्ये गेल्यास या प्रतिमेला तडा बसण्याची शक्यता असल्याने वरपूडकर यानी पक्षातच राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. राज्यात भाजप- शिवसेना (Shivsena) व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महायुती आहे. पाथरी व जिंतूर मतदारसंघ भाजपकडे आहेत. गंगाखेड मतदारसंघ महायुतीमधील मित्रपक्षाकडे आहे. त्यामुळे भाजपमध्ये प्रवेश करून राजकीय भवितव्य धोक्यात येण्याची अधिक शक्यता गृहीत धरून वरपूडकर यांनी चव्हाण यांच्यासोबत जाणे टाळले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Ashok Chavan
Shivsena Politics : शिवसेनेकडून आयात उमेदवार राज्यसभेवर; देवरांचा शिवसेनाप्रवेश ही भाजपची स्क्रिप्ट?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com