Dhananjay Munde Reaction On OBC Reservation News Sarkarnama
मराठवाडा

Dhananjay Munde News : जीव गेल्यावर आरक्षण मागायचे कुणासाठी? बांधवांनो टोकाचं पाऊल उचलू नका! धनंजय मुंडेंचे आवाहन

OBC Reservation Controversy : आज मन हेलावून टाकणाऱ्या दोन दुर्दैवी घटना समजल्या आणि पुन्हा एकदा समाजव्यवस्था म्हणून आपण कुठे चाललो आहोत, असा प्रश्न मनाला भिडला.

Jagdish Pansare

  1. धनगर आरक्षणासाठी टोकांच पाऊलं उचलल्यानंतर प्रतिक्रिया देताना मंत्री धनंजय मुंडेंनी बांधवांना भावनिक आवाहन केले की, “जीव गेल्यावर आरक्षण मागायचं कुणासाठी?”

  2. मुंडेंनी आंदोलनकर्त्यांना टोकाचं पाऊल न उचलण्याचं आणि संयम बाळगण्याचं आवाहन केले.

  3. सरकारकडून या प्रश्नावर सकारात्मक भूमिका घेतली जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

OBC Reservation News : राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष भडकला आहे. आधी आरक्षणासाठी मराठा समाजातील अनेक तरूणांनी बलिदान दिले. आता ओबीसी आरक्षण धोक्यात आल्याच्या उद्विग्नेतून या समाजाचे तरूण टोकाचे पाऊलं उचलंत आहेत. जीव गेल्यावर आरक्षण मागायचे कुणासाठी? बांधवांनो टोकाचं पाऊल उचलू नका, असे आवाहन आमदार धनंजय मुंडे यांनी केले आहे.

अकोला जिल्ह्यातील विजय बोचरे आणि अहिल्यानगरच्या कानोशी येथील अमोल दौंड या वीस वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त करतांनाच ओबीसी समाज बांधवांना टोकाचे पाऊलं न उचलण्याचे आवाहन केले आहे.

आज मन हेलावून टाकणाऱ्या दोन दुर्दैवी घटना समजल्या आणि पुन्हा एकदा समाजव्यवस्था म्हणून आपण कुठे चाललो आहोत, असा प्रश्न मनाला भिडला. अकोला जिल्ह्यातील आलेगाव येथील विजय बोचरे या ओबीसी (OBC) समाज आरक्षणाच्या चळवळीतील सक्रिय सहकाऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. दुसरीकडे अहिल्यानगर जिल्ह्यातील कोनोशी (ता. शेवगाव) येथील अमोल दौंड या 20 वर्षीय तरुणाने आरक्षणाच्या उद्विग्नतेतून आत्महत्या केली.

दोन्हीही मृतात्म्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ देवो, अशा भावना मुंडे यांनी व्यक्त केल्या. आरक्षणाच्या लढाईला आत्महत्या हे उत्तर असू शकत नाही. जीव गेल्यावर आरक्षण मागायचे कुणासाठी? आपल्या अशा जाण्याने मागे जो दुःखाचा डोंगर उभा राहतो, त्याचा विचार आपण केला पाहिजे. आत्महत्या हे कोणत्याच प्रश्नाचे किंवा समस्येचे निराकरण नाही, बांधवांनो टोकाचे पाऊल उचलू नका. संवैधानिक मार्गाने आपण आपला लढा लढू आणि एकमेकांच्या साथीने त्याला मजबूत करू, असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी केले आहे.

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीनंतर राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला. नोंदीनूसार कुणबी प्रमाणपत्रांचे वाटपही सुरू झाले आहे. परंतु या निर्णयाने ओबीसी आरक्षण धोक्यात आल्याचा आरोप करत संघटनांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. राज्यभरात आंदोलने सुरू आहेत, तर काहीजणांनी टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवले. मराठा आरक्षणाच्या विरोधात ओबीसींचा मोठा मोर्चाही निघणार आहे. अशातच अकोला आणि अहिल्यानगरमध्ये ओबीसी आरक्षणासाठी दोन आत्महत्या झाल्याने राजकीय वातवरण तापले आहे.

धनंजय मुंडेंनी हे आवाहन कोणत्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केले?
उत्तर: हे आवाहन धनगर समाजाच्या आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केले गेले.

2. प्रश्न: मुंडेंनी आंदोलनकर्त्यांना काय सांगितले?
उत्तर: त्यांनी सांगितले की, “जीव देऊन आरक्षण मिळत नाही, संयम ठेवा आणि चर्चा करून तोडगा काढूया.”

3. प्रश्न: ओबीसी समाजाची मागणी काय आहे?
उत्तर: मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण, कुणबी प्रमाणपत्र देऊ नये.

4. प्रश्न: मुंडे यांनी सरकारच्या भूमिकेबद्दल काय सांगितले?
उत्तर: त्यांनी सांगितले की, सरकार या विषयावर सकारात्मक आणि संवेदनशील पवित्रा घेईल.

5. प्रश्न: या आवाहनामुळे समाजात काय प्रतिक्रिया उमटल्या?
उत्तर: काहींनी मुंडेंच्या आवाहनाचे स्वागत केले, तर काहींनी ठोस कृतीची मागणी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT