Akola News, 09 Oct : 'ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, जातीय जनगणना झाली पाहिजे अन्यथा आमच्या जगण्याला अर्थ नाही असा व्हॉट्सअप स्टेटस ठेवत अकोला जिल्ह्यातील आलेगाव येथील विजय बोचरे (59) नावाच्या व्यक्तीने गुरूवारी (09) पहाटे बसस्थानकाच्या शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
आत्महत्या केलेले विजय बोचरे हे राष्ट्रवादीचे नेते तथा कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांचे समर्थक असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांनी आत्महत्येपूर्वी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांच्या नावाने लिहिलेलं पत्र व्हॉट्सअप स्टेटसला ठेवलं होतं.
मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे ओबीसी नेते विजय बोचरे यांनी पातुर तालुक्यातील आलेगाव गावातील बसस्थानकाच्या शेडमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. राज्य शासनाने मराठा आरक्षणासाठी हैद्राबाद गॅझेट संदर्भात काढलेल्या जीआरमुळे ओबीसी समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
शिवाय या जीआरमुळे मूळ ओबीसींचे आरक्षण संपल्याची खंत देखील बोचरे यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रातून व्यक्त केली आहे. तसंच ओबीसींच्या मुलाबाळांचे भविष्य सुरक्षित नसल्याने आत्महत्या करत असल्याचंही त्यांनी या पत्रात लिहिलं आहे.
आत्महत्येपूर्वी ठेवलेल्या व्हॉट्सअप स्टेटसमध्ये लिहिलं की, 'राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या संदर्भात घेतलेल्या निर्णयामुळे OBC समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. आमच्या मुलाबाळांचं भविष्य धोक्यात आलं आहे. शिक्षणात, नोकरीत आणि राजकारणात आमचं स्थान हरवत चाललं आहे.
आमच्या जगण्याला काही अर्थ नाही. जय ओबीसी, जय संविधान. जातीय जनगणना झाली पाहिजे आणि ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये.' तर या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.