Dhananjay Munde Letter To CM Devendra Fadnavis News  Sarkarnama
मराठवाडा

Dhananjay Munde News : 'एन टी-डी' प्रवर्गासाठी एकही जागा नाही, हा अन्याय! आरोग्य विभागाची जाहिरात रद्द करा! धनंजय मुंडेंचे मागणी

Dhananjay Munde Write Letter To Devendra Fadnavis : राज्यभरात या प्रवर्गातील लाखो विद्यार्थी वरील पदांसाठी तयारी करत असून या जाहिरातींच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याची भावना आहे.

Jagdish Pansare

  1. आरोग्य विभागाच्या जाहिरातीत एन टी-डी प्रवर्गासाठी एकही जागा नसल्याचा मुद्दा धनंजय मुंडेंनी उपस्थित केला.

  2. मुंडेंनी हा सरळ अन्याय असल्याचं सांगत जाहिरात रद्द करण्याची मागणी केली.

  3. त्यांनी सरकारला तातडीने सुधारणा करून एन टी-डी प्रवर्गाला न्याय द्यावा अशी मागणी केली.

Maharashtra News : राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने समुदाय आरोग्य अधिकारी (कंत्राटी) तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांची पद भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र या पदांसाठी विविध प्रवर्गासाठी जागा राखीव असताना 'एन टी -डी' प्रवर्गासाठी एकही जागा आरक्षित करण्यात आलेली नाही. ही बाब राज्याचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार धनंजय मुंडे यांच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी आरोग्य विभागाच्या या दोन्ही जाहिराती स्थगित करून एन टी-डी प्रवर्गासाठीच्या जांगाचा समावेश करून त्या नव्याने प्रसिद्ध कराव्यात, अशा मागणीचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आविटकर यांना लिहले आहे.

4 नोव्हेंबर 2025 रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने समुदाय आरोग्य अधिकारी (कंत्राटी) 1974 जागा व वैद्यकीय अधिकारी (गट - अ) 1440 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. यातील समूदाय आरोग्य अधिकारी पदाच्या जाहिरातीत एन टी - डी प्रवर्गासाठी एकही जागा आरक्षित करण्यात आलेली नाही. तर दुसऱ्या वैद्यकीय अधिकारी भरतीच्या जाहिरातीत एन टी प्रवर्गातील अ,ब,क,ड या चारही प्रवर्गांसाठी एकही जागा आरक्षित करण्यात आलेली नाही.

राज्यभरात या प्रवर्गातील लाखो विद्यार्थी वरील पदांसाठी तयारी करत असून या जाहिरातींच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याची भावना आहे. तरी कोणत्याही प्रवर्गावर अन्याय होणार नाही या दृष्टीने या दोन्हीही जाहिराती स्थगित करून सर्वसमावेशक पद्धतीने सदर जाहिराती नव्याने प्रसिद्ध करण्यात याव्यात, अशी विनंती या पत्राच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री व आरोग्य मंत्र्यांकडे केली आहे.

राज्य सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत समुदाय आरोग्य अधिकारी कंत्राटी भरती संदर्भात तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी गट अ जाहिरातीमध्ये एन टी-डी प्रवर्गासाठी एकही जागा आरक्षित नसल्याबद्दल आमदार धनंजय मुंडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यामुळे एनटी प्रवर्गातील अनेक उमेदवारांवर अन्याय होणार आहे. या संदर्भात अनेक उमेदवारांनी दूरध्वनीवरून तसेच प्रत्यक्ष भेटून प्रत्यक्ष भेटून माझ्याकडे तक्रारी केल्या आहेत.

कोणत्याही प्रवर्गावर अन्याय होणार नाही यासाठी या दोन्हीही जाहिराती स्थगित करून नव्याने प्रसिद्ध करण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी देवेंद्र फडणवीस तसेच सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आविटकर यांच्याकडे केली आहे. धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत समुदाय आरोग्य अधिकारी पदाच्या 1974 पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून या जाहिरातीमध्ये एन टी प्रवर्गासाठी एकही जागा आरक्षित नसल्याची गंभीर बाब समोर आल्याचे नमूद केले आहे.

त्याचबरोबर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीत एकूण चौदाशे चाळीस वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती करण्यात येत असून या जाहिरातीमध्ये एन टी प्रवर्गातील 'अ ब क ड' या चारही प्रवर्गांसाठी एकही जागा आरक्षित करण्यात आलेली नाही. राज्यभरात या प्रवर्गातील लाखो विद्यार्थी असून ते या पदांसाठी प्रयत्न करत आहेत. या पदासाठी इच्छुक असलेल्या एनटी प्रवर्गातील अनेक उमेदवारांनी दूरध्वनीद्वारे तसेच विविध माध्यमातून माझ्याकडे तक्रार केल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

या दोन्हीही जाहिरातीच्या माध्यमातून एनटी प्रवर्गासाठी सुमारे साडेतीन हजार जागांमध्ये एकही जागा आरक्षित नसणे ही बाब संतापजनक व दुःख देणारी आहे. दरम्यान या दोन्हीही जाहिरातींच्या माध्यमातून एन टी प्रवर्गासाठी जागा आरक्षित नसणे हे गंभीर व अन्यायकारक असून तातडीने जाहिरातीस स्थगिती देऊन आरक्षित पदांची फेर तपासणी करून सुधारित जाहिरात प्रसिद्ध करणे गरजेचे आहे. आपणास विनंती की कोणत्याही प्रवर्गावर अन्याय होणार नाही यासाठी या दोन्हीही जाहिराती स्थगिती देऊन नव्याने जाहिरात प्रसिद्ध करण्यात याव्यात, असे मुंडे यांनी पत्रात नमूद केले आहे.

FAQs

प्रश्न 1: धनंजय मुंडे यांनी कोणत्या मुद्द्यावर सरकारवर टीका केली?
उत्तर: एन टी-डी प्रवर्गासाठी आरोग्य विभागाच्या भरतीत एकही जागा नसल्याबद्दल.

प्रश्न 2: मुंडेंनी कोणती मागणी केली आहे?
उत्तर: त्यांनी आरोग्य विभागाची जाहिरात रद्द करून नवी सुधारित जाहिरात काढण्याची मागणी केली आहे.

प्रश्न 3: हा प्रश्न कोणत्या विभागाशी संबंधित आहे?
उत्तर: महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाशी संबंधित आहे.

प्रश्न 4: एन टी-डी प्रवर्ग म्हणजे काय?
उत्तर: एन टी-डी हा ओबीसीमधील उपप्रवर्ग असून आरक्षण धोरणांतर्गत विशेष सवलती मिळतात.

प्रश्न 5: सरकारची या मागणीवर काय प्रतिक्रिया होती?
उत्तर: सरकारने याबाबत अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT