Dhananjay Munde : महिला डाॅक्टर आत्महत्येप्रकरणी एसआयटी स्थापन करण्याची धनंजय मुंडेंची मागणी; म्हणाले, 'बीडमधील लोकांना हीन वागणूक...'

Satara Doctor Death Case : आमदार धनंजय मुंडे यांनी आत्महत्या केलेल्या महिला डाॅक्टरच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सात्वंन केले. मुख्यमंत्र्यांनाकडे आपण या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Minister Dhananjay Munde meets the family of the deceased woman doctor in Satara; demands SIT probe into the case
Minister Dhananjay Munde meets the family of the deceased woman doctor in Satara; demands SIT probe into the casesarkarnama
Published on
Updated on

Dhananjay Munde News : फलटणमधील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डाॅक्टरने गळफास घेत आत्महत्या केली. तिने आत्महत्येपूर्वी आपल्या हातावर सुसाईड नोट देखील लिहिली होती. यामध्ये आपल्यावर अत्याचार करण्यात आल्याचे म्हटले होते. या प्रकरणी पोलिसांनी दोघा जणांना अटक केली आहे. महिला डाॅक्टर ही मुळ बीड जिल्ह्यातील होती. माजी मंत्री, आमदार धनंजय मुंडे यांनी महिला डाॅक्टरच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सात्वंन केले. तसेच या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली आहे.

ते म्हणाले, अतिशय कष्टातून शिकवून आपल्या लेकराला डॉक्टर बनवून जीवन दानाच्या कार्यास समर्पित केलेल्या माता पित्याच्या व कुटुंबियांच्या भावना व त्यांचे शब्द हृदय हेलावून टाकणारे आहे. कुटुंबीयांनी डॉ. संपदाच्या मृत्यू बाबत उपस्थित केलेले काही प्रश्न, मृत्यू व त्यानंतर घडलेल्या नाट्यमय घडामोडी हे देखील संशयास्पद आहे.

'मागील काही महिन्यांपासून ठराविक लोकांनी बीड जिल्ह्याची जी बदनामी केली, त्यातून आपले पोट भरायला किंवा शिकायला जे लोक जिल्ह्याच्या बाहेर राहतात त्यांना जी उपेक्षा आणि हीन वागणूक दिली जातेय, त्या त्रासाचा सुद्धा ही आमची बहीण एक बळी आहे...', असे देखील त्यांनी यांनी म्हटले.

Minister Dhananjay Munde meets the family of the deceased woman doctor in Satara; demands SIT probe into the case
Election Commission : निवडणूक आयोग आज सर्वात मोठी घोषणा करणार; महाराष्ट्राबाबत महत्वाची अपडेट

पुढे त्यांनी म्हटले की, आत्महत्या केलेल्या डॉक्टर तरुणीच्या तक्रारी, त्यावरील चौकश्या, त्यातील जबाब, अहवाल, स्थानिक पोलिसांची सुरुवातीपासूनची त्रासाची भूमिका, उपजिल्हा व जिल्हा रुग्णालय प्रशासनाने केलेला हलगर्जीपणा या सर्वच गोष्टींचा निष्पक्ष तपास होणे गरजेचे आहे. शिवाय अशा घटना पुन्हा घडणार नाहीत यासाठीही एक उदाहरण प्रस्थापित करणे गरजेचे आहे.

एसआयटी स्थापन करा

या संपूर्ण प्रकरणाची एका आयपीएस दर्जाच्या वरिष्ठ महिला पोलिस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन करण्यात यावी, त्या समिती मध्ये सातारा जिल्ह्यात सेवेत असलेल्या एकही अधिकारी - कर्मचाऱ्याला सहभागी करण्यात येऊ नये व या प्रकरणाची वस्तुनिष्ठ चौकशी करून हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून सर्व दोषींना कठोर शासन केले जावे व पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे करणार असल्याचे सांगितले.

Minister Dhananjay Munde meets the family of the deceased woman doctor in Satara; demands SIT probe into the case
Jain Boarding Land Deal : जैन बोर्डिंग प्रकरणात मोठी अपडेट, बिल्डर गोखलेंची माघार; व्यवहार रद्द!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com