Dhananjay Munde Ajit pawar .jpg Sarkarnama
मराठवाडा

Dhananjay Munde : बीडचं पालकमंत्रिपद गमावल्यानंतर धनंजय मुंडेंचं पहिलं ट्विट; म्हणाले, '…याचा मला आनंद वाटतो!'

Beed Guardian Minister : बीड सरपंच संतोष देशमुख यांचे हत्याप्रकरण धनंजय मुंडेंना भोवले असल्याचे दिसत आहे. धनंजय मुंडेंना बीडच नाहीतर अन्य कुठल्याच जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले नाही. त्यामुळे त्यांच्याकडे कॊणत्याच जिल्ह्याचे पाल्कमंत्रीपद नसणार आहे.

Deepak Kulkarni

Beed News : देवेंद्र फडणवीस नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप होऊन जवळपास महिनाभराचा काळ उलटला आहे.त्याचवेळी प्रजासत्ताक दिन अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपला असतानाही पालकमंत्रिपदाचा तिढा सुटत नसल्यानं विरोधकांकडून सरकारवर टीकेची झोड उठवण्यास सुरुवात झाली होती.

पण काही जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपद वाटपावरून महायुतीच्या तीन पक्षांच्या नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेच दिसून येत होती.त्यावर तोडगा काढत शनिवारी पालकमंत्रिपदं जाहीर करण्यात आली. पण यात बीडचं पालकमंत्रिपद धनंजय मुंडेंना (Dhananjay Munde) गमवावं लागलं. यानंतर आता मुंडेंनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

पुण्यासह बीडच्याही पालकमंत्रिपद धुरा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) त्यांच्याकडे ठेवल्यानंतर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. बीडचं पालकमंत्रिपद गमावण्याची वेळ मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरणामुळे मुंडेंवर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याचवेळी धनंजय मुंडेंनी ट्विटद्वारे या चर्चांना प्रत्युत्तर दिले आहे.

धनंजय मुंडे यांनी ट्विटमध्ये म्हणतात,मीच अजितदादांना बीडचं पालकमंत्रीपद स्वीकारण्याची विनंती केली होती,असं म्हटलं आहे. याचवेळी त्यांनी बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि खूप खूप स्वागतही केलं आहे.आदरणीय दादांच्या नेतृत्वात बीड जिल्ह्याच्या विकासाला पुणे जिल्ह्याप्रमाणे अधिकची गती आणि चालना मिळेल, असा मला विश्वास आहे,असंही मुंडेंनी यावेळी सांगितलं आहे.

...याचा मला आनंद वाटतो!

धनंजय मुंडे पुढे म्हणतात,बीड जिल्ह्यातील सध्या बदललेली राजकीय व सामाजिक स्थिती पाहता मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय यांना मी स्वतः बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद अजितदादांनी स्वीकारण्याबाबत विनंती केली होती.त्यानुसार दादांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद स्वीकारले,याचा मला आनंद वाटत असल्याची भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

सद्यस्थितीत मला कोणत्याच जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी नको,अशी माझी विनंतीही मान्य केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच एकनाथ शिंदे यांचे आभारही मानले आहे. मला दिलेल्या विभागाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील,असंही मुंडे यांनी ट्विटमध्ये नमूद केलं आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्याप्रकरण धनंजय मुंडेंना भोवले असल्याचे दिसत आहे. धनंजय मुंडेंना बीडच नाहीतर अन्य कुठल्याच जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले नाही. त्यामुळे त्यांच्याकडे कॊणत्याच जिल्ह्याचे पाल्कमंत्रीपद नसणार आहे. बीड व पुण्याचे पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आले आहे. पालकमंत्र्यांची निवड होण्यापूर्वी बीडचे पालकमंत्रीपद धनंजय मुंडेंना देण्यात येऊ नये, अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT